Header AD

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी रिपाइं चे मुंबईत आंदोलन


मुंबई |  प्रतिनिधी  : -   सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईसह राज्यभर आंदोलन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्स नियम पाळून सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइं च्या वतीने आज दुपारी मालाड पूर्वेतील पोद्दार रोडवर मातृकृपा हनुमान मंदिर येथे रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच चेंबूर टिळकनगर येथील सर्वोदय बुद्ध विहार येथे  रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.


तसेच हाजी अली दर्गा येथे ही रिपाइं नेते सोना कांबळे गोरगाव येथे रमेश पाईकराव आदींनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासठी आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान उद्या दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता चैत्यभूमी येथे ही भीम अनुयायांना चैत्यभूमी येथे  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमी खुली करावी या मागणीसाठी रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले स्वतः नेतृत्व करणार आहेत. 
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी रिपाइं चे मुंबईत आंदोलन सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी रिपाइं चे मुंबईत आंदोलन Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एक हजार रिक्षांवर पाठींब्याचे पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा

कल्याण , कुणाल म्हात्रे   :    दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक राज्यात या शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. आता या बाबत डों...

Post AD

home ads