कल्याण डोंबिवलीत ५०० नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू
◆ एकूण रुग्ण ३५,७३५ तर ७३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४८६ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण |कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ५०० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजच्या या ५०० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३५,७३५ झाली आहे. यामध्ये ५२७७ रुग्ण उपचार घेत असून २९,७२४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५०० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ५२, कल्याण प.- १२७, डोंबिवली पूर्व १९७, डोंबिवली प- ९८, मांडा टिटवाळा – १३, मोहना -१२, तर पिसवली येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून ७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १२ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

Post a Comment