Header AD

अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे वक्तव्य करू नये पालिका आयुक्तांचे आवाहन


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : डोंबिवलीत दोन दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या कोरोना परिषदेत लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांच्या बरोबरच आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्त हटाव अशी मागणी केली होती. या मागणीवर प्रतिक्रिया देताना आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे वक्तव्य करू नये असे आवाहन राजकीय नेत्यांना केले आहे.

महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर १५ दिवसातच करोनाचे संकट समोर उभे ठाकले यावेळी महापालिकेची आरोग्य व्यवस्था अतिशय तोकडी होती. त्यामधून मार्गक्रमण करत करोनाचे संकट रोखण्यासाठी प्रयत्न केले. आतापर्यंत केलेल्या कामाचा उल्लेख आमदार रविंद्र चव्हाण  आणि खासदार डॉ शिंदे यांनी केला आहे. शासन केलेल्या कामाचे मूल्यमापन करत असते.

नागरिकांच्या सोयीसाठी रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत आमचे सगळे कर्मचारी अधिकारी काम करत आहेत. आज पालिकेचे स्वतःचे १२०० ऑक्सिजन आणि २५० आयसीयू बेड तयार आहेत. माझ्याबरोबर माझे सर्व कर्मचारी अधिकारी रात्र दिवस काम करत आहेत त्यांचे मनोबल खच्चीकरण होईल असे वक्तव्य कृपया करू नका असे आवाहन पालिका आयुक्त डॉ सूर्यवंशी यांनी केले आहे.


अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे वक्तव्य करू नये पालिका आयुक्तांचे आवाहन अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे वक्तव्य करू नये पालिका आयुक्तांचे आवाहन Reviewed by News1 Marathi on September 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads