Header AD

सर्राईत बाईक चोराला खडकपाडा पोलिसांनी केली अटक कारवाईत १६ दुचाकी केल्या हस्तगत


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  सराईत बाईक चोराला अटक करण्यात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना यश आले असून या चोराकडून १६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊन दरम्यान  कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरी व चैन स्नेचींगच्या घटना वाढल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. खडकपाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी कल्याण नजिक आंबिवली येथील इराणी वस्ती येथे येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी या ठिकाणी सापळा रचत सिध्दार्थ उर्फ विक्की कांबळे याला अटक केली.

त्याच्या चौकशी दरम्यान विक्की आपले साथीदार राजू वाघ, फारुख इराणी, इन्नू इराणी, अली इराणी यांच्यासोबत पार्किंग मधील महागड्या  मोटरसायकल चोरी करत असे. तसेच या मोटरसायकलवरून ही टोळी कल्याण डोंबिवली सह ठाणे नाशिक आदी ठिकाणी चैन स्नेचिंग करत असल्याचे उघड झाले. पोलीस विक्कीच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत. विक्की कडून त्यांनी चोरी केलेल्या १६ मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. तसेच ठाणे आयुक्तालयातील १० मोटरसायकल चोरीचे व नाशिक येथिल चैन स्नेचिंगचे गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांनी दिली.

      हि कारवाई व.पो.नि. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी. प्रितम चौधरी, पोहवा चव्हाण, पवार, ठोके, देवरे, पोना डोंगरे, पोशि आहेर, कांगरे, थोरात, बडे, राठोड यांच्या पथकाने केली आहे. 

सर्राईत बाईक चोराला खडकपाडा पोलिसांनी केली अटक कारवाईत १६ दुचाकी केल्या हस्तगत सर्राईत बाईक चोराला खडकपाडा पोलिसांनी केली अटक  कारवाईत १६ दुचाकी केल्या हस्तगत Reviewed by News1 Marathi on September 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads