Header AD

स्थायीसमिती सभा व्हिडिओकॉन्फरन्स द्वारे न घेता प्रत्येक्ष सभागृहात घेण्याची नगरसेवक कृष्णा पाटील यांचीमागणी


महापौर आणि स्थायी समिती सभापतींना पत्र लिहून केली विनंती...


ठाणे  |  प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिकेची उद्या होणारी स्थायी समिती सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न घेता पालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात यावी अशी मागणी पालिकेचे विद्यमान नगरसेवक, स्थायी समिती सदस्य कृष्णा दादू पाटील यांनी केली आहे. महापौरासह स्थायी समिती सभापतींना पत्र लिहून मागणी केली आहे. 


ठाणे महानगरपालिकेची स्थायी समिती सभा उद्या होत आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती प्रत्येक्ष न घेता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र मागील महिन्यात अशाच पद्धतीने सभा घेण्यात आली होती परंतु अनेक तांत्रिक अडचणीमुळे सभेत प्रचंड गोंधळ उडाला होता. 
ही परिस्थिती लक्षात घेता कोव्हिडं 19 चे नियम पाळून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा न घेता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सभा घेण्याचे नियोजन करता करावे अशी विनंती त्यांनी केली आहे. पालिकेच्या अनेक बैठका पालिकेच्या सभागृहात होत असतात. स्थायी समिती ही पालिकेची  महत्वाची समिती असून या सभेत होणारे निर्णय अत्यंत महत्वाचे असतात. त्यामुळे प्रत्येक्ष सभा घेणे गरजेचे असल्याचे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले. 


स्थायी समिती सभा उद्या असताना सभेचे विषय पत्रिका आदल्या दिवशी दिले जाते. मात्र ही प्रशासकीय कामकाजाची पद्धत अत्यंत चुकीची असून यात बदल होणे गरजेचे आहे. प्रत्येक सदस्याला किमान सभेच्या 10 दिवस अगोदर विषय पत्रिया मिळणे गरजेचे आहे असेही मत श्री.पाटील यांनी व्यक्त केले.


स्थायीसमिती सभा व्हिडिओकॉन्फरन्स द्वारे न घेता प्रत्येक्ष सभागृहात घेण्याची नगरसेवक कृष्णा पाटील यांचीमागणी स्थायीसमिती सभा व्हिडिओकॉन्फरन्स द्वारे न घेता प्रत्येक्ष सभागृहात घेण्याची नगरसेवक             कृष्णा पाटील यांचीमागणी Reviewed by News1 Marathi on September 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads