Header AD

कोविड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपा महिला मोर्चा आक्रमक


पोलीस उपायुक्त आणि पालिका आयुक्तांना दिले निवेदन...

कल्याण | कुणाल  म्हात्रे  : कोविड सेंटरमध्ये महिलांकरीता स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करून तिथे उपचाराकरीता महिला स्टाफची नेमणूक करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी तसेच कोविड सेंटरमध्ये महिला रूग्णांच्या सुरक्षीततेसाठी महिला पोलीसांची नेमणूक करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा  आक्रमक झाले असून महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्षा नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत निवेदन दिले आहे.


       संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारिची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच एकूण महिला सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कोविड सेंटरमध्ये महिला रूग्णांच्या सुरक्षिततेकरीता प्रत्येक कोविड सेंटरमध्ये २४ तास महिला पोलीस कॉन्स्टेबलांची नेमणूक करण्यात यावी. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस प्रत्येक कोविड सेंटरमध्ये महिला पोलीसांमार्फत गस्त घालण्याची मागणी पोलीस उपायुक्तांकडे करण्यात आली.



तर कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र महिला वॉर्ड निर्माण करून प्रत्येक कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत व आपत्कालीन पॅनिक बटन बसविण्यात यावे. महिला वॉर्डमध्ये महिलांच्या उपचारासाठी स्वतंत्र महिला स्टाफ नेमण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास भाजपा महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांनी दिला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रिया शर्मा,  जिल्हा सरचिटणीस पुष्पा रत्नपारखीडोंबिवली ग्रामीण अध्यक्षा मनीषा राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


कोविड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपा महिला मोर्चा आक्रमक कोविड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपा महिला मोर्चा आक्रमक  Reviewed by News1 Marathi on September 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर भीषण अपघात मद्यधुंद भरधाव डंपर चालकाची चार वाहनांना धडक एकाचा मृत्यू

भिवंडी ,प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाने भरधाव वेगाने जात अ...

Post AD

home ads