Header AD

ठामपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र उमेदवार उभे करण्यात येणार


 

ठाणे  |  प्रतिनिधी  :  येत्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र उमेदवार उभे करण्यात येणार असून काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी आतापासूनच प्रत्येक प्रभागात लोकोपयोगी कार्यक्रमा पाठोपाठ नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे उद्गार ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत बोलताना काढले.


ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली होती यानंतर या नवनिर्वाचित कार्यकरीनी बैठक मुब्रा येथे आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज शिंदे,अनिल साळवी,प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप,जे.बी.यादव,अनिस कुरेशी महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने,युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी, एन.एस.यु .आय्. अध्यक्ष आकाश राहाटे आदि पदाधिकारी उपस्थित होते .



याप्रसंगी बोलताना काँग्रेस पक्ष बुथ स्तरापासून मजबूत करणे हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून आपली कार्यकारीनी कार्यरत राहील असे चव्हाण यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना सांगितले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे, रविंद्र कोळी यांनी केले बैठकीचे संपूर्ण  नियोजन ठाणे शहर काँग्रेस ब्लाॅक अध्यक्ष निलेश पाटील,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वसीम हजरत यांनी केले.

ठामपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र उमेदवार उभे करण्यात येणार ठामपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र उमेदवार उभे करण्यात येणार Reviewed by News1 Marathi on September 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणा बेस मेटल व कच्च्या तेलाला आधार

  मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस म...

Post AD

home ads