Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
कल्याण , प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे गुरुवारी कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...


कल्याण उपप्रादेशिक कार्यालयामार्फत आँनलाईन माध्यमातून शिकाऊ वाहन चालक परवाना, मुदततील वाहन चालक परवाना, तसेच वाहन चालकांना कायस्वरूपी वाहन चालक परवाना चाचणी परिक्षा घेऊन दिले जातात. कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन नियमाच्या अमंलबाजवणी निमित्ताने अनेक शिकाऊ तसेच कायमस्वरूपी वाहनचालक परवाना मिळणेबाबत आँनलाईन केलेले अर्ज संख्या पाहता या वाहनचालकांना लवकरात परवाना मिळण्यासाठी विशेष मोहिम सुरु केली असुन या अंतर्गत ९ सप्टेंबर, १० सप्टेंबर रोजी कँम्पच्या माध्यमातून चालक परवाने चाचणी परीक्षा घेण्यात आल्या. तसेच या मोहिमेअर्तगंत शनिवारी, रविवारी देखील शिकाऊ वाहन चालक, परवाना, तसेच कायमस्वरूपी वाहन चालक परवाना देणेबाबत वाहन चालकांच्या परीक्षा चाचण्या घेण्यात येणार आहेत.
या मोहिमेचा शिकाऊ वाहन चालक परवाना तसेच कायमस्वरूपी वाहन चालक परवाना बाबत आँनलाईन माध्यमातून अर्ज करून या मोहिमेचा फायदा घ्यावा असे अवाहान नव्याने चार्ज घेतलेले कल्याण उपप्रादेशिक आधिकारी तानाजी चव्हाण यांनी केले आहे.
शुन्य पेडिंग मोहिमे अर्तगत् कोवीड लाँकडाऊन काळामुळे आँनलाईन माध्यमातून अर्ज केलेल्या शिकाऊ तसेच कायमस्वरूपी चालक परवाना चाचणी परीक्षा देणार्या अर्जदारांच्या वाहन चालक परवाना कामचा निपटारा होऊन वाहन चालक परवाना लवकर मिळणार असल्याने आँनलाईन माध्यमातून वाहन चालक परवाना अर्ज केलेल्या ना दिलासा मिळणार आहे.
कल्याण , प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे गुरुवारी कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...
Created By SoraTemplates & MyBloggerThemes
Back To Top
Post a Comment