Header AD

ठाण्यातील दोन हॉस्पिटलांना लँक्‍सेसकडून मिळाले सहा व्‍हेंटिलेटर्स


मुंबई :- देशातील नोव्‍हेल कोरोनाव्‍हायरस महामारीचे निर्मूलन करण्‍यामध्‍ये साह्य करण्‍यासाठी स्‍पेशालिटी केमिकल्‍स कंपनी लँक्‍सेसने आज ठाण्‍यामधील कौशल्‍य मेडिकल फाऊंडेशन ट्रस्‍ट हॉस्पिटल आणि बेथानी हॉस्पिटलला १ कोटी रूपयांहून अधिक मूल्‍य असलेले सहा व्‍हेंटिलेटर्स दान केले. दोन्‍ही हॉस्पिटल्‍सना प्रत्‍येकी तीन व्‍हेंटिलेटर्स दान करण्‍यात आले आहेत. हे दान कंपनीच्‍या २०२०-२०२१ साठी सीएसआर उपक्रमाचा भाग आहे.

ठाण्‍यामधील हे हॉस्पिटल्‍स आसपासच्‍या परिसरांमधील रूग्‍णांच्‍या उपचारासाठी या व्‍हेंटिलेटर्सचा उपयोग करतील. लँक्‍सेस महामारीविरोधातील लढ्यामध्‍ये स्‍थानिक समुदायाला साह्य करण्‍यासाठी त्‍यांच्‍या संघटित प्रयत्‍नांमध्‍ये अधिकारी व वैद्यकीय संस्‍थांसोबत सक्रियपणे सहयोग करत आली आहे.


गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये लँक्‍सेस इंडियाने कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्‍ये प्राइम मिनिस्‍टर्स सिटीझन असिस्‍टन्‍स अॅण्‍ड रिलीफ इन इमर्जन्‍सी सिच्‍युएशन्‍स फंडमध्‍ये (पीएम केअर्स) २ कोटी रूपयांची आर्थिक मदत आणि महाराष्‍ट्र, मध्‍यप्रदेश व गुजरात या राज्‍यांमधील स्‍थानिक अधिका-यांना ३० लाख रूपयांच्‍या मदत साहित्‍याचे दान यांचा समावेश आहे. तसेच अक्षय पात्र फाऊंडेशनसोबत सहयोग करण्‍यात आला. कंपनीने या सहयोगाच्‍या माध्‍यमातून गरजू व्‍यक्‍तींना ३०,००० हून अधिक मोफत भोजन दिले.


लँक्‍सेसने महाराष्‍ट्र सरकार मदत समन्‍वय केंद्राच्‍या माध्‍यमातून बीएमसी व टीएमसीला १ टन अत्‍यंत प्रभावी पृष्‍ठभाग निर्जंतुक 'रिलाय+ऑन विक्रॉन™' दान करत कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्‍यामध्‍ये मदत केली.


कौशल्‍य मेडिकल फाऊंडेशन ट्रस्‍ट हॉस्पिटलयेथील एमएस ऑर्थो, डीएनबी ऑर्थो, एफआयसीएस (यूएसए), कन्‍सल्‍टण्‍ट ऑर्थोपेडिक आणि जॉइण्‍ट रिप्‍लेसमेंट सर्जन डॉ. समीप सोहोनी म्‍हणाले, ''आम्‍ही तीन व्‍हेंटिलेटर्स दान केल्‍याबद्दल लँक्‍सेस इंडियाचे आभार मानतो. हे अत्‍यंत महत्त्वाचे उपकरण आहे, जे आयसीयूमध्‍ये कोविड रूग्‍णांचा, तसेच ऑक्सिजन पातळी कमी असलेल्‍या रूग्‍णांचा उपचार करण्‍यामध्‍ये आवश्‍यक आहे. आम्‍ही या पाठिंब्‍यासाठी लँक्‍सेस इंडियाच्‍या व्‍यवस्‍थापकीय मंडळाचे आभार मानतो. आम्‍हाला विश्‍वास आहे की, हे दान आम्‍हाला अधिक जीवन वाचवण्‍यामध्‍ये साह्य करेल आणि गेल्‍या ५ महिन्‍यांपासून कोविड रूग्‍णांच्‍या उपचारासाठी अथकपणे मेहनत घेत असलेल्‍या आमच्‍या टीमला नैतिक प्रोत्‍साहन देखील मिळेल.''


या पाठिंब्‍यासाठी लँक्‍सेसचे आभार मानत बेथानी हॉस्पिटलचे सीओओ विजय लक्‍का म्‍हणाले, ''या टप्‍प्‍यावर लँक्‍सेस इंडियाचे या उच्‍चस्‍तरीय व्‍हेंटिलेटर्सचे दान आमच्‍या हॉस्पिटलला विशेषत: जगभरात क्रिटिकल-केअर इक्विपमेंटचा तुटवडा असताना अधिक जीवन वाचवण्‍यामध्‍ये साह्यभूत ठरेल. या विशिष्‍ट व्‍हेंटिलेटर्समध्‍ये असलेली हाय-फ्लो नसल ऑक्सिजन (एचएफएनओ) थेरपी अॅक्‍यूट हायपोक्झिमिक रिस्‍पायरेटरी फेलरने पीडित रूग्‍णांना श्‍वसनविषयक पाठिंबा देऊ शकते आणि सध्‍याच्‍या महामारी स्थितीमध्‍ये इनट्यूबेशनला प्रतिबंध करू शकते. आमच्‍या समुदायाचा भाग बनण्‍यासोबत या अवघड काळामध्‍ये मदतीचा हात पुढे करण्‍यासाठी आभार.'' 


लँक्‍सेस इंडियाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक नीलांजन बॅनर्जी म्‍हणाले, ''सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये वैद्यकीय संस्‍था व त्‍याच्‍या पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. महत्त्वपूर्ण विभागाकडे त्‍वरित लक्ष देण्‍याची गरज लक्षात घेत आम्‍ही हा ताण कमी करण्‍यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आमच्‍या योगदानाचा विशेषत: क्रिटिकल केअर उपलब्‍ध करून देण्‍याचा आणि या हॉस्पिटल्‍समधील जीवनदायी पायाभूत सुविधा वाढवण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही आपल्‍या समाजामध्‍ये लक्षणीय बदल घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत आणि महामारीविरोधातील लढ्यामध्‍ये समुदायाला मोठ्या प्रमाणात साह्य करण्‍याचे प्रयत्‍न सुरूच ठेवू.''


कौशल्‍य मेडिकल फाऊंडेशन ट्रस्‍ट हॉस्पिटल बाबत

कौशल्‍य मेडिकल फाऊंडेशन ट्रस्‍ट हॉस्पिटल ठाण्‍यामधील त्‍यांच्‍या १०० बेड तृतीय सेवा सुविधेमध्‍ये वर्ष २००२ पासून ठाणे शहर व जिल्‍ह्यामधील लोकांना सेवा देत आले आहे. हॉस्पिटलचे समर्पित कोविड हॉस्पिटल म्‍हणून सेवाकार्य १७ एप्रिल २०२० रोजी सुरू झाले आणि आतापर्यंत त्‍यांनी ठाणे शहर व आसपासच्‍या परिसरांमधील ११०० हून अधिक कोविड-१९ रूग्‍णांचा उपचार केला आहे.


बेथानी हॉस्पिटल

बेथानी ट्रस्‍ट ही बेथानी हॉस्पिटलची मालक असून त्‍याचे कार्यसंचालन पाहते. प्रत्‍येक जीवन हे देवाची बहुमूल्‍य भेट आहे आणि आम्‍ही त्‍याकडे लक्ष देण्‍यास कटिबद्ध आहोत या मूलभूत विश्‍वासासह वर्ष १९९७ मध्‍ये हॉस्पिटलची स्‍थापना करण्‍यात आली. या १९० बेडच्या तृतीय केअर सुविधेमध्‍ये कोविड-१९ महामारीदरम्‍यान ९०० हून अधिक रूग्‍णांचा कोविड-१९ साठी उपचार करण्‍यात आला आणि हॉस्पिटलने गरजूंचे उपचार करण्‍याचे कार्य सुरूच ठेवले आहे. 


लँक्‍सेस बाबत

लँक्सेस ही आघाडीची स्पेशालिटी केमिकल कंपनी असून २०१९ मध्ये त्यांची ६.८ बिलियन युरो इतकी विक्री होती. सध्या त्यांच्याकडे ३३ देशांमध्ये १४,३०० कर्मचारी आहेत. लँक्सेसचा मुख्य उद्योग हा केमिकल इंटरमिडिएट्स, अॅडिटिव्‍हज, स्पेशाल्टी केमिकल्स व प्लास्टिक्सचा विकास, उत्पादन आणि विपणन करणे हा आहे. लँक्सेस हे आघाडीच्या डाऊ जोन्स सस्टेनेबलिटी इंडेक्स (डीजेएसआय वर्ल्ड व युरोप) आणि एफटीएसई४ गुडचे सदस्य आहेत.

ठाण्यातील दोन हॉस्पिटलांना लँक्‍सेसकडून मिळाले सहा व्‍हेंटिलेटर्स ठाण्यातील दोन हॉस्पिटलांना लँक्‍सेसकडून मिळाले सहा व्‍हेंटिलेटर्स Reviewed by News1 Marathi on September 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads