Header AD

स्वच्छतेबाबत सहाय्यक आयुक्तांनी सतर्क राहावे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांचा इशारा दोन दिवसांनतर प्रभागामध्ये अचानक पाहणी करणार
अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा....

 

ठाणे  | प्रतिनिधी  :   शहरातील स्वच्छता माझ्यासाठी अतिशय महत्वाचा विषय असून सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत सतर्क राहण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत दिला. दरम्यान दोन तीन दिवसानंतर कोणत्याही प्रभागाचा पाहणी दौरा करून स्वच्छता कशी आहे याची पाहणी करणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.


आज सकाळी महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी अचानक दोन-तीन प्रभाग समितीची पाहणी करून काही ठिकाणच्या कचऱ्याबाबत असमाधान व्यक्त करून आज सायंकाळी तातडीने सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांनी स्वच्छतेबाबत कुठलीही सबब ऐकूण घेतली जाणार नाही असे सांगून सर्व सहाय्यक आयुक्तांनी येत्या तीन दिवसांत आपला प्रभाग स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी असे सांगितले.


 

मालमत्ता कराच्या चेक भरणासाठी ड्रॅाप बॅाक्स

 

महापालिकेचे विविध कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवू नका. त्यांना मदत करा अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या. ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर धनादेशद्वारे भरायचा आहे त्यांच्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत उद्या सायंकाळपर्यंत चेक ड्रॅाप बॅाक्स बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा मालमत्ता कराच्या देयकाची झेरॅाक्स कॅापी, आपले नाव, संपर्क क्रमांक, ग्राहक क्रमांक आदी तपशीलासह आपला चेक ड्रॅाप बॅाक्समध्ये टाकल्यास दुसऱ्या दिवशी त्यांना त्याची पावती देण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.


 

सातनंतर सुरू राहणाऱ्या दुकांनांवर कारवाई करा

 

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सायंकाळी सातपर्यत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. महापालिकेनही तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. तरीही काही आस्थापना सात नंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सातनंतर ज्या आस्थापना उघड्या आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत सर्व सहाय्यक आयुक्तांनी रोज सायंकाळी सात ते साडे सात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून सात नंतर सुरू असणाऱ्या तसेच ज्या ठिकाणी गर्दी होते अशा आस्थापना, अन्न पदार्थाचे स्टॅाल्सवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.


 

मास्क वापराची सक्ती करा

 

सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभाग समितीतंर्गत नागरिकांनी मास्कचा वापुर करावा यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करावी तसेच नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची सक्ती करावी. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहे. या बैठकीला परिमंडळ उपायुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

स्वच्छतेबाबत सहाय्यक आयुक्तांनी सतर्क राहावे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांचा इशारा दोन दिवसांनतर प्रभागामध्ये अचानक पाहणी करणार स्वच्छतेबाबत सहाय्यक आयुक्तांनी सतर्क राहावे  महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांचा इशारा  दोन दिवसांनतर प्रभागामध्ये अचानक पाहणी करणार Reviewed by News1 Marathi on September 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads