Header AD

वित्तीय क्षेत्रात घसरण सेन्सेक्सची १३४ अंकांनी गटांगळी


मुंबई  :  वित्तीय क्षेत्रांच्या घसरणीमुळे भारतीय निर्देशांकांतही आज घट दिसून आली. फार्मा आणि ऑटो क्षेत्राला नफा झाल्याने बाजारातील नुकसान मर्यादित राहिले. निफ्टी ०.१०% किंवा ११.१५ अंकांनी घसरला. ११,५०० अंकांची पातळी राखत ११,५०४.९५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी सेन्सेक्स ०.३४% किंवा १३४.०३ अंकांनी घसरून ३८,८४५.८२ अंकांवर विसावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात डॉ. रेड्डीज (९.९२%), सिपला (७.११%), अदानी पोर्ट्स (३.३७%), भारती एअरटेल (३.७३%) आणि एमअँडएम (२.८५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर कोटक बँक (१.८५%), एचडीएफसी बँक (२.२८%), श्री सिमेंट (२.००%), बजाज फिनसर्व्ह (१.८५%) आणि मारुती सुझुकी (१.८२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.बँकिंग आणि वित्तीय सेवा निर्देशांक लाल रंगात स्थिरावले आणि प्रत्येकी १% नी घसरले. निफ्टी एफएमसीजीदेखील ०.६% नी घटला. बीएसई मिडकॅप ०.२६% नी वधारला तर बीएसई स्मॉलकॅप ०.३२% नी घटला.

एस्सेल प्रोपॅक लि.: ब्लॅकस्टोनने तिचे शेअर्स या पॅकेजिंग फर्मला विकायचे ठरवले. कंपनीचे स्टॉक्स ८.१०% नी घसरले व त्यांनी २५०.६५ रुपयांवर व्यापार केला. या करारामुळे गुंतवणूकदारांसाठी २५१ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याची शक्यता आहे.

लुपिन अँड सिपला: लुपिन लिमिटेडचे शेअर्स ४.५२% नी वाढले व त्यांनी १,०८३.९५ रुपयांवर व्यापार केला. तर सिपला लिमिटेडचे शेअर्स ७.११% नी वाढले व त्यांनी ८०४.९० रुपयांवर व्यापार केला. पेरिगो नावाच्या आयरिश फार्मा कंपनीने अल्बूटेरॉल सल्फेट इनहेलेशन एरोसोल्स स्वेच्छेने परत आणल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. काही अडथळ्यांमुळे त्यांचे योग्यप्रकारे वितरण होणार नाही, या चिंतेमुळे हे पाऊल उचलण्यात आले.

कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड: रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)सोबत रशियन कोरोना व्हायरस लस स्पुटनिक व्ही भारतात आणण्यासाठी कंपनी चर्चा करत आहे. कंपनीच्या अहवालानुसार, तिला पोटॅशिअम क्लोराइड एक्सेटंंडेड-रिलीझ टॅब्लेटच्या विक्रीसाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ३.८९% नी वाढ झाली व त्यांनी ५,३०६.०० रुपयांवर व्यापार केला.

डॉ. रेड्डडीज लॅबोरेटरीज: अमेरिकेतील ब्रिस्टल मायर्स स्क्विबच्या युनिटसोबतच कर्करोगाच्या रेव्हलिमिड या उपचाराबाबत खटला सेटल झाल्याची नोंद कंपनीने केली. त्यानंतर कंपनीचे शेअर्स ९.९२% नी वाढले व त्यांनी ५,३०६.०० रुपयांवर व्यापार केला.

फायझर लि.: फायझर कंपनीने कोव्हिड-१९ लसीची चाचणी घेतलेल्या उमेदवारांवर प्रभाव पडल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट चिन्ह दिसून आले, अशी माहिती दिल्यानंतर कंपनीचे स्टॉक्स १.०९ टक्क्यांनी वाढले व त्यांनी ५००९.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात विक्री दिसून आल्याने भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २० पैशांनी मजबूत झाला. त्याने ७३.४५ रुपयांचे मूल्य कमावले.

सोने: आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्डचे दर वाढल्याने आजच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याने उच्चांकी व्यापार केला. आजच्या सत्रात व्यापारी ५१,२०० रुपयांच्या पातळीवर सोने खरेदी करू शकतात.

जागतिक बाजार: आजच्या सत्रात वाढत्या कोव्हिड-१९ च्या रुग्णांमुळे तसेच डॉलरचे मूल्य घसरल्याने जागतिक बाजार कमकुवत दिसून आला. नॅसडॅकचे शेअर्स १.२७%, एफटीएसई १०० चे शेअर्स ०.१३% आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.१०% नी घसरले तर निक्केई २२५ आणि हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.१८% आणि ०.४७% नी घटले.

वित्तीय क्षेत्रात घसरण सेन्सेक्सची १३४ अंकांनी गटांगळी वित्तीय क्षेत्रात घसरण सेन्सेक्सची १३४ अंकांनी गटांगळी Reviewed by News1 Marathi on September 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads