Header AD

प्रोसस सिका सादर इन्व्हेस्ट इंडिया आणि सोशल अल्फाची भागीदारी

◆ Øआत्मनिर्भर भारताच्या दिशेने नवामार्ग  Øअपंग  व्यक्तींना (पर्सन्स विथ डिसअॅबिलिटीज-पीडब्ल्यूडी) साह्य करण्यासाठी असिस्टिव्ह टेक्नोलॉजिस


मुंबई  :  प्रोसस या नॅस्पर्सच्या जागतिक कन्झ्युमर इंटरनेट ग्रूपने इन्व्हेस्ट इंडिया आणि सोशल अल्फाच्या सहकार्याने प्रोसस सोशल इम्पॅक्ट चॅलेंज फॉर अॅक्सेसिबिलिटी (प्रोसस सिका) सादर करत असल्याची घोषणा केली आहे.

दहा वर्षांपेक्षा कमी काळ कार्यरत असलेल्या आणि डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटर्नल ट्रेडवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची मान्यता असलेल्या भारतीय स्टार्टअप्ससाठी ही स्पर्धा खुली असेलविजेती उत्पादने सामाजिक स्तरावर परिणामकारकतांत्रिकदृष्ट्या नाविन्यपूर्णशाश्वतस्केलेबल आणि अपंग व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यास सक्षम असतील.

प्रोससने तीन वर्षांच्या कालावधीत प्रोसस सिकासाठी 16,500,000 रुपयांची तरतुद केली आहे आणि दरवर्षी पहिल्या तीन स्टार्टअप्सना पुरस्कार दिला जाईलस्टार्टअप इंडिया हब तर्फे त्यांच्या वेबसाइटवर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

प्रोससच्या चीफ पीपल ऑफिसर आयलीन ओटुले म्हणाल्या, "भारतीय उद्योजक एका आकर्षक भविष्याला आकार देत आहेत आणि अनोख्या सामाजिक गरजांना पर्याय देणारे व्यवसाय उभारत आहेतअपंग व्यक्तींच्या आयुष्याला साह्यकारी ठरणाऱ्या असिस्टिव्ह तंत्रज्ञानासंदर्भात काम करणाऱ्या भारतातील स्टार्टअप्सना साह्य करण्यास प्रोसस उत्सुक आहेआर्थिक साह्यासोबतच आपल्या भागीदारांच्या सहकार्याने प्रोसस तांत्रिक साह्यमेंटॉरशीप आणि व्यावसायिक सल्लेही पुरवेलया स्टार्टअप्सना यशस्वी होण्यात साह्य करण्याची आमची इच्छा आहेया उपक्रमामुळे डिजिटल इंडिया आणि अॅक्सेसिबल इंडिया अशा दोन महत्त्वाच्या सरकारी मोहिमाही एकत्र येतील."

इन्व्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीदीपक बगला म्हणाले, "या संकटकाळात भारतीय बुद्धिमत्तेतील उत्कृष्ट प्रतिभा आघाडीवर आहेतमहत्वाची आणि परवडणाऱ्या दरातील परिणामकारक पर्याय निर्माण करण्याची उद्योजकांची क्षमता म्हणजे भारताचे बळ आहेमाननीय पंतप्रधानांनी दाखवलेल्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण मार्गक्रमण करत असताना भारतात या क्षमतांची उभारणी केली जाणे आणि जगभरात असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहेअपंग व्यक्तींसाठी साह्यकारी तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी असलेल्या या स्पर्धेतून हे उद्दिष्ट गाठण्यात साह्य केले जाईल."

सोशल अल्फाचे अध्यक्ष आणि संस्थापक श्रीमनोज कुमार म्हणाले, "अपंग व्यक्तींना सक्षम करू शकतील अशा दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरातील साह्यकारी तांत्रिक पर्यायांची भारतात प्रचंड कमतरता आहेअपंग व्यक्तींना साह्यकारी ठरतील अशा नाविन्यपूर्ण प्रयोगांमध्ये व्यावसायिक गुंतवणूक करण्यास आपण प्रोत्साहन द्यायला हवेया क्षेत्रात आम्ही 2018 पासून काम करण्यास सुरुवात केली आणि आजवर 15 स्टार्टअप्सना उत्पादन-बाजापेठेचा मेळ बसवणेक्लिनिकल ट्रायल्समधील साह्य आणि वितरण आणि सेवा माध्यमांमध्ये असलेली दरी कमी करणे यासाठी साह्य केले आहेस्टार्टअप इंडिया आणि प्रोसससोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि या स्पर्धेतून उद्योजगंना नव्या आकर्षक संधी मिळतीलअशी आम्हाला आशा वाटते."

संबंधित उत्पादन सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात असावे किंवा वापरकर्त्यांच्या मान्यतेचा टप्पा पार केलेला असावासहभागी उत्पादनांची छाननी ख्यातनाम परीक्षक करतील तसेच या क्षेत्रातील तज्ञ त्याचे मूल्यांकन करतील आणि अंतिम वापरकर्त्यांच्या मुलाखती आणि वापराचे प्रात्यक्षिकही केले जाईल.

पुरस्काराच्या रकमेसोबतच पात्र स्टार्टअप्सना सोशल अल्फासोबत काम करण्याची संधीही मिळेलविजेत्या स्टार्टअपला प्रोसस सिका मेंटॉरशीप प्रोग्राममध्ये समाविष्ट केले जाईलत्यामुळे उद्योजकांना साहय करण्याच्या आणि त्यांच्या यशाला पाठिंबा देण्याच्या प्रोससच्या व्यापक अनुभवाचा लाभ या स्टार्टअप्सना मिळेल.

सहभागींना या स्पर्धेविषयी आणि स्टार्टअप इंडिया हबच्या अर्जप्रक्रियेविषयी  http://bit.ly/ProsusSICA इथे जाणून घेता येईल.

अर्जप्रक्रिया 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत खुली असणार आहे.

प्रोसस सिका सादर इन्व्हेस्ट इंडिया आणि सोशल अल्फाची भागीदारी प्रोसस सिका सादर  इन्व्हेस्ट इंडिया आणि सोशल अल्फाची भागीदारी Reviewed by News1 Marathi on September 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads