कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची राष्ट्रवादीची मागणी
◆ राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांचे राज्य सरकारला साकडे....
कल्याण | कुणाल म्हात्रे : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना दुसरीकडे खाजगी रुग्णालयात नागरिकांची लुट होत आहे. हि लुट थांबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची आणि लॉकडाऊन काळात महावितरणने पाठवलेले भरमसाठ वीजबिलं अर्धे माफ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर राज्यात लॉकडाउन करण्यात आले, त्यामुळे अनेक लोक बेकार झाले. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ज्या वेळेस राज्य सरकारने कोरोनाला महामारी घोषित केले त्यावेळी राज्य सरकारने घोषणा केली होती की राज्यातील कोरोना ग्रस्त प्रत्येक नागरिकाला मोफत इलाज मिळेल. परंतु सध्या राज्यात परिस्थिती वेगळी आहे. राज्य सरकारने लॉकडाउन लावतांना जे कुटुंब भाड्याने राहत आहे किंवा जो भाडयाच्या दुकानात व्यवसाय करत आहे त्यांना या लॉकडाउनच्या काळात भाडे देण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. परंतु तसे काही झाले नाही, उलट जागा मालकाने जागा खाली करण्याची तकादा लावत बरेच लोकांना घर आणि दुकान खाली करायला लावण्यात आले. आणि बरेचसे लोक या लॉकडाउन मुळे बेघर ही झाले आहेत.
आगोदरच कोरोना महामारी आणि लॉकडाउन मुळे जनता देशोधडीला लागुन हैराण झाले होते, तर तेवढयात महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी ने नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल देउन जुलुम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या दुख आणि अडचणी लक्षात घेऊन राज्यात सर्व कोरोना ग्रस्त नागरिकांना सरसकट मोफत इलाज मिळावा. ज्या देशात एखाद्या रोगराईला किंवा आजारपणाला महामारी घोषित केलं जातं त्याची आणि जनतेची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असते. तसेच कोरोना महामारी व लॉकडाउन मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत त्रस्त झालेल्या नागरिकांना सहानुभूती दाखवून राज्य सरकारने अर्धा वीज बिल माफ करावा अशी मागणी देखील नोवेल साळवे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस पारसनाथ तिवारी, सुभाष गायकवाड, प्रकाश तरे, रमेश गंगावणे, शरद गवळी आदीजण उपस्थित होते.
Post a Comment