Header AD

कल्याण डोंबिवलीत ५७८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू


 

◆ एकूण रुग्ण ३,६८६  तर  ७२१ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४२९ रुग्णांना डिस्चार्ज

 

कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज नव्या ५७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

      आजच्या या ५७८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३,६८६ झाली आहे. यामध्ये ५१३२ रुग्ण उपचार घेत असून २८,८३३  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

       आजच्या ५७८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – १४८,  कल्याण प.- २०४डोंबिवली पूर्व १०२डोंबिवली प- १०४मांडा टिटवाळा – १०मोहना – तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे.  डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून ८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ५७८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ५७८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर भीषण अपघात मद्यधुंद भरधाव डंपर चालकाची चार वाहनांना धडक एकाचा मृत्यू

भिवंडी ,प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाने भरधाव वेगाने जात अ...

Post AD

home ads