Header AD

रोटरी क्लब ऑफ़ डोंबिवली वेस्ट तर्फे शासकीय पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभाग


 

कल्याण  |  कुणाल  म्हात्रे  :  मानवतेला अपंग करणाऱ्या पोलिओ या विकाराचे जगातून समूळ उच्चाटन करण्याच्या मानवाच्या प्रतिज्ञेला भक्कम आधार देण्यासाठी रोटरी इंटरनॅशनल ही संस्था कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट या संस्थेने डोंबिवली जवळील निळजे गावातील  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शासकीय पोलिओ लसीकरण कार्यात स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला.

 क्लबचे दुसरे नवनिर्वाचित सदस्य डॉ. मंगेश पराडकर ह्या केंद्रात शासकीय डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या शासकीय पोलिओ निर्मूलनकार्यातही आपल्या क्लबला सहभागी करुन घेतले. निळजे गावाच्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत एकूण सत्तावन्न लसीकरण बूथची सोय करण्यात आली होती. प्रत्येक बूथवर कमीत कमी दोन स्वयंसेवक तैनात केलेले होते.
 केंद्राचे प्रमुख डॉ. रमेश राठोड ह्यानी त्यांच्या केंद्राच्या कामकाजाची माहिती दिली. डॉ. मंगेश पराडकर ह्यांचे सहाय्यक राजेश थोरात हे देखील उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष दिलीप भगत, सचिव शैलेश गुप्ते ह्या रोटेरियन्सनी उपस्थित राहून वरील पोलिओ लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभाग दिला आणि कठीण परिस्थितीतही आपल्या सेवाकार्याचे व्रत सुरू ठेवले. ह्या मोहिमेत एकूण १६७७० एवढी मुले अपेक्षित लाभार्थी होती त्यापैकी एकूण १४७६८ (८८%) मुलांनी पोलिओ लसीकरण करुन घेतले. 

रोटरी क्लब ऑफ़ डोंबिवली वेस्ट तर्फे शासकीय पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभाग रोटरी क्लब ऑफ़ डोंबिवली वेस्ट तर्फे शासकीय पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभाग Reviewed by News1 Marathi on September 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads