Header AD

फॅटीग रिमाईंडर सिस्टमसह येणार एमजी ग्लॉस्टर


◆ लेन डिपार्चर वॉर्निंग वैशिष्ट्याचाही असणार समावेश
 

मुंबई : लक्झरी कार ब्रॅंड क्षेत्रात आता एमजी कार मोटर्स आपल्या नव्या उत्पादनासह प्रवेश करत आहे. ग्लॉस्टरच्या माध्यमातून स्मार्ट मोबॅलिटीसह (अद्ययावत तंत्रज्ञानासह) या क्षेत्रात नवीन वादळ निर्माण करायला कंपनी उत्सूक आहे. प्रिमियम एसयूव्ही एमजी ग्लॉस्टर स्वयंसाशित आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह अवतरत आहे. यात फॅटीग रिमाईंडर (थकव्याची सुचना देणारी यंत्रणा) आणि लेन डिपार्चर वॉर्निंग (आपल्या पुढे चालणा-या गाडीचे अंतर राखून चालणारी यंत्रणा) अशा अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे दोनही सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयुक्त असे फिचर्स आहेत.

तुम्ही रस्त्यावरून लेनमध्ये जात असताना समोरील गाडी आणि तुमच्या गाडीतील अंतर राखण्यासाठी ही नवीन फिचर्स उपयुक्त आहेत. फॅटिंग रिमाईंडर सिस्टम गाडी चालवताना स्टेअरिंग इनपुट देण्याचे काम हे फिचर करते. केवळ वेळ न दर्शवता तुम्ही थकला असाल तर या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे याची माहितीही तुम्हाला मिळू शकते. यासह फ्रंट कोलिजन वॉर्निंग, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर, आणि ऑटो पार्क असिस्ट या सुविधाही गाडीमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फेब्रुवारीत झालेल्या ऑटो एक्स्पो २०२० मध्ये पहिल्यांदा ही कार लॉंच करण्यात आली. प्रिमियम एसयूव्ही आणि लँड क्रुझर प्राडो सारख्या गाड्यांना ग्लॉस्टर बाजारात टक्कर देईल.

फॅटीग रिमाईंडर सिस्टमसह येणार एमजी ग्लॉस्टर फॅटीग रिमाईंडर सिस्टमसह येणार एमजी ग्लॉस्टर Reviewed by News1 Marathi on September 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads