Header AD

भाजपाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्ताने ठामपा दुर्लक्षीत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप


◆ ठाणे भाजपाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्ताने ठामपा गडकरी रंगायतन घाणेकर नाट्यगृहाच्या दुर्लक्षीत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करताना....


ठाणे | प्रतिनिधी  :  प्रखर राष्ट्रभक्त ,अंत्योदयाचे प्रणेते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाच्या पशवभूमीवर आर्थिक दृष्ट्या दुर्लक्षीत अशा ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायत तसेच काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या कर्मचारी वर्गाला नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी व समाजसेवक डॉ.राजेश मढवी यांचे सौजन्याने जीवनावश्यक वस्तूचे धान्य, कडधान्य,तेल इत्यादींचे वाटप करण्यात आले .
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधवी ताई नाईक यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार संजय केळकर ,अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. सदर धान्य वाटपास  प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी आमदार आशीष शेलार, प्रदेश सचिव संदीप लेले ,गटनेते संजय वाघुले ,नगरसेविका मृणाल पेंडसे ,सरचिटणीस विलास साठे, मनोहर सुखदरे ,गौरव सिंग ,भाऊ दामले,शरदजी पुरोहित ,सचिन आळशी ,क्षमाताई पातकर ,बापट  दाम्पत्य, परुळेकर,उतेकर तसेच युवा अध्यक्ष प्रशांत कळंबटे ,विनायक गाडेकर व असंख्य मान्यवर उपस्थित होते.
भाजपाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्ताने ठामपा दुर्लक्षीत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप भाजपाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्ताने ठामपा  दुर्लक्षीत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप Reviewed by News1 Marathi on September 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads