Header AD

अमृत अभियानाच्या अंमलबजावणीत केडीएमसी तिसऱ्या क्रमांकावर


कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात सुरु असलेल्या अमृत अभियाना अंतर्गत विकास कामांच्या अंमलबजावणी मूल्यांकन निकषानुसार अमृत अभियान राबिविणार्या १५ शहारात तिसरा क्रंमाक प्राप्त करीत केडीएमसीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अमृत अभियानांतर्गत केन्द्र सरकार ३३.३३ टक्के अनुदान, राज्य शासन १६.६७टक्के अनुदान तसेच मनपाचा ५० टक्के  हिस्सा निधीतून मलनिस्सारणपाणी पुरवठातसेच हरित पट्टा विकसित करणे अशी सुमारे  ४८० कोटीची विकास कामे सन २०१६- १७ पासुन सुरु आहेत.  कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेने अमृत अभियान प्रकल्‍पांमध्‍ये भौतिक प्रगती करुन महाराष्‍ट्रात २०० कोटी रक्‍कमेपेक्षा जास्‍त रक्‍कमेचे प्रकल्‍प राबविणा-या १५ शहरात यापूर्वी असलेल्या ९ व्या क्रमांकावरुन ३ -या क्रमांकाचा बहुमान प्राप्‍त केला आहे.   प्रधान सचिवनगर विकास विभाग यांच्या अधिपत्‍याखाली शुक्रवारी संपन्‍न झालेल्‍या अमृत प्रकल्‍प योजनेच्‍या ऑनलाईन बैठकीत, 'अमृत प्रकल्‍पअंमलबजावणीमध्‍ये मूल्‍यांकन निकषानुसार हा क्रमांक प्राप्त केला आहे.  

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अमृत अभियाना अंतर्गत मलनिःसारण टप्‍पा क्र. १ टप्‍पा क्र.२,  मध्ये मनपा क्षेत्रात भुयारी गटार बनविणेपंपिंग स्टेशन बांधणे मल प्रक्रिया केन्द्र बांधणे आदींची टप्पा क्रं १ मधील ६५ टक्के कामे तर टप्पा क्रं २ मधील ४५ टक्के  कामे प्रगती पथावर असुन २७ गावातील पाणी पुरवठा योजना राबविणे,  अर्तगत पाणी पुरवठा वितरण वाहिन्या टाकणे तसेच जलकुंभ बांधणे ही कामे सुरु असुन कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेमध्‍ये हरित पट्टा निर्माण करणे,  या प्रकल्‍पात  आंबिवली येथे सुमारे १५ एकर जागेत वुक्ष लागवडतसेच उंबर्डे,  नेतवली टेकडी येथे वुक्ष लागवड करीत झाडे लावा झाडे जगवा मोहिमेनुसार १०० टक्के लक्षणीय प्रगती साधुन महानगरपालिकेने हे गुणांकन मिळविले आहे.

याकामी पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वेळोवेळी अमृत अभियान प्रकल्‍पाबाबत बैठका घेवून प्रकल्‍पात येणा-या समस्‍यांचे निवारण केले व संबंधित महानगरपालिका अधिकारी महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना मार्गदर्शन केल्‍यामुळे सदर कामात ही प्रगती साधता आली.

अमृत अभियानाच्या अंमलबजावणीत केडीएमसी तिसऱ्या क्रमांकावर अमृत अभियानाच्या अंमलबजावणीत  केडीएमसी तिसऱ्या क्रमांकावर Reviewed by News1 Marathi on September 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads