Header AD

एन.आर.सी. शाळेतील क्वारंटाइनसेंटर त्वरित सुरु करण्याची भा.ज.यु.मोर्चाची मागणी


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असून रुग्णांना उपचार मिळण्यासाठी विविध ठिकाणी कोविड सेंटर आणि  क्वारंटाइन सेंटर उभारण्याचे काम सुरु आहे. अशाच प्रकारे मोहने येथील एन.आर.सी. शाळेत देखील पालिकेने क्वारंटाइन सेंटर उभारले असून ते अद्यापही सुरु केले नाही. त्यामुळे हे क्वारंटाइन सेंटर त्वरित सुरु करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे विभाग उपाध्यक्ष सुशीलकुमार पायाळ यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे  केली आहे.

       कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागात आंबिवली, मोहने परिसरात  मोठी लोकसंख्या असून याठिकाणी देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी कल्याण डोंबिवली भिवंडी आदी ठिकाणी जावे लागत आहेत. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी महानगरपालिकेने मोहने येथील एन.आर.सी. शाळेत क्वारंटाइन सेंटर उभारले आहे. मात्र अद्यापही ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

       त्यामुळे पालिकेने योग्य त्या उपाययोजना करून आणि पुरेसे मनुष्यबळ देऊन हे क्वारंटाइन सेंटर तात्काळ सुरु करून करदात्या नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासापासून वाचविण्याची मागणी  सुशीलकुमार पायाळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.     

एन.आर.सी. शाळेतील क्वारंटाइनसेंटर त्वरित सुरु करण्याची भा.ज.यु.मोर्चाची मागणी एन.आर.सी. शाळेतील क्वारंटाइनसेंटर त्वरित सुरु करण्याची भा.ज.यु.मोर्चाची मागणी Reviewed by News1 Marathi on September 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads