Header AD

५००रुपयांच्या वादातून वाईनशॉप मँनेजरला कात्रीने भोसकले दुकानातील थरार सीसी टीव्हीत कैदकल्याण   | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील म्हारळ येथे  ५०० रुपयांच्या वादातुन तळीरामाने वाईन शॉपमध्ये घुसुन मँनेजरला कात्रीने भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर नजीक असलेल्या म्हारळ गावात दोन दिवसापूर्वी घडली. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून कल्याण तालुका पोलिसांनी हल्लेखोर आरोपीचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन त्याला अटक केली आहे. गोविद वर्मा असे अटकेत असलेल्या हल्लेखोर तळीरामाचे नाव आहे. तर लच्छु आहुजा (३६) असे गंभीर जखमी झालेल्या वाईन शॉप मँनेजर नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमध्ये रहाणारे लच्छु आहुजा हे रोझ वाईनशॉप या देशी विदेशी दारू विक्रीच्या दुकानात मँनेजर म्हणून काम पाहतात. या वाईन शॉपमध्ये दोन दिवसापूर्वी सायंकाळच्या ८.३०च्या सुमारास दुकान बंद करण्याच्या समयी आरोपी गोविद वर्मा हा साथीदारांसह दारू खरेदीसाठी आला होता. त्यावेळी ५०० रुपयांच्या बिलावरून  मँनेजर  विजय आहुजा आणि आरोपी गोविद यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आरोपीने धारदार कात्री  घेऊन वाईन शॉपमध्ये घुसला. दरम्यान यांचा वाद सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या मँनेजर लचु आहुजा यांच्या पोटात कात्री भोसकली. हे पाहून वाईन शॉप मधील इतर कामगारांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातात धारदार कात्री असल्याने त्याने साथीदारासह पोबारा केला.


दरम्यानघटनेची माहिती कल्याण तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा करीत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला. बुधवारी आरोपीला शहाड परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे. तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वेबजरंग राजपूत करीत आहेत.

५००रुपयांच्या वादातून वाईनशॉप मँनेजरला कात्रीने भोसकले दुकानातील थरार सीसी टीव्हीत कैद ५००रुपयांच्या वादातून वाईनशॉप मँनेजरला कात्रीने भोसकले दुकानातील थरार सीसी टीव्हीत कैद Reviewed by News1 Marathi on September 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads