कोविड योद्धा असलेले कोरोना काळात काम करतांना शाहिद झाले त्यांना अजित दळवी यांची सायकल वरून अनोखी श्रद्धांजली
मुंबई | प्रफुल गांगुर्डे : नाहूर येथील 26 वर्षीय तरुण अजित दळवी सायकलिस्ट, हा कोविड योद्धा असलेले डॉक्टरांना, नर्स, पोलिसांना आणि कोरोना काळात काम करताना शाहिद झाले त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 4000 किलो मीटर महाराष्ट्र वारी सायकल वरून करणार आहे त्या साठी शनिवारी सकाळी मुलुंड येथून रवाना झाला आहे अजित 20 दिवसात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 4000 किलोमीटर सायकल वारी करून सिंधुदूर्ग या जिल्ह्यात सांगता करणार आहे .
बी ए शिक्षण झालेल्या अजित याला लहान पणा पासून सायकल चालवण्याची आवड आहे तो माझगाव डॉक मुंबई येथे रोज सायकलनेच प्रवास करतो रोज जवळ जवळ 70 किलो मीटर प्रवास करतो शनिवारी पहाटे 5 वाजता नाहूर (मुंबई) येथून आपल्या प्रवासाची सुरुवात केली आणि 20 दिवसांच्या आत 36 जिल्ह्यांचा समावेश करणार आहे पहिला थांबा नाशिक येथे करणार आहे आणि कोकण महाराष्ट्रातील सिंगुदुर्ग जिल्ह्यात त्यांचा समारोप करणार असल्याचे अजित ने सांगितले, या सायकल वारी मुळे राज्यभर आघाडीवर असलेल्या सर्व कोविड योद्धांना प्रोत्साहित करण्याची कल्पना त्याने मांडली आणि अजितने पर्यावरणाचा संदेश दिला आहे.
कोविड योद्धा असलेले कोरोना काळात काम करतांना शाहिद झाले त्यांना अजित दळवी यांची सायकल वरून अनोखी श्रद्धांजली
Reviewed by News1 Marathi
on
September 19, 2020
Rating:

Post a Comment