लॉकडाऊन मध्ये एमसीएचआयकडून सर्वसामान्यांना दिलासा घरांची स्टँप ड्युटी ३१ ऑक्टोबर पर्यत माफ
कल्याण | कुणाल म्हात्रे : नवीन घेण्यात येणाऱ्या घरांसाठी स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय विकासकांची संस्था क्रेडाई एमसीएचआयने घेतला आहे. नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांना या योजने मुळे दिलासा मिळणार आहे. या पूर्वी सरकारने चार टक्के असलेली स्टॅम्प ड्युटी तीन टक्के माफ केली होती. आता विकासकांनी देखील स्टँप ड्युटी माफ केल्याने आता नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना ३१ ऑक्टोबर पर्यत या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कल्याण डोंबिवली क्रेडाई एमसीएचआय युनिटने कल्याण डोंबिवलीत नाविन घर घेणाऱ्या ग्राहकांना 'झिरो परसेन्ट' स्टॅम्प ड्युटी ही योजना एका पत्रकार परिषदेत जाहीर केली. ३१ ऑक्टोबर पर्यत ही योजना लागू असणार आहे. लॉक डाऊनच्या काळात अनेक नागरिकांना आर्थिक झळ बसली आहे. अश्या या काळात ही योजना जाहीर झाल्याने काही प्रमाणात नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
लॉकडाऊनमध्ये मिशन बिगेनअगेन मध्ये भाड्याने राहणाऱ्या अनेकांनी स्वतःचे घर बुक केले असून घर घेणाऱ्यांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे. ग्राहकांना केंद्रबिदू ठेवीत ही योजना जाहीर करण्यात आल्याचे या वेळी क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. तर सेक्रेटरी विकास जैन यांनी बोलताना सांगितले की, या योजनेमुळे राज्य सरकारच्या घरांची मागणी वाढविण्याच्या धोरणांना बळ मिळेल. क्रेडाई एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रावी पाटील यांनी बोलताना सांगितले की या योजने मुळे नाविन घर घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळेल.
कोरोनाच्या या काळात अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अश्यात क्रेडाई एमसीएचआय ची ही "झिरो परसेन्ट" स्टॅम्प ड्युटी केल्याने मुळे मोठा दिलासा ग्राहकांना मिळणार आहे.
Post a Comment