Header AD

डोंबिवलीतील पश्चिमेकडील एकमेव पोस्ट कार्यालयात नागरिकांचे हाल मनसेनी विचारला जाब


 

डोंबिवली | शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेकडे उमेशनगर जवळ एकमेव पोस्ट कार्यालय आहे.मात्र या कार्यालयातील कामाची संथगती आणि सर्व्हर स्लो असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत.यामुळे कार्यालयात गर्दी होत असल्याने सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे दिसून येते. मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष राजेश कदम जिल्हा अध्यक्ष, कल्याण जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर,विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगेसंदीप(रमा)म्हात्रेसचिन कस्तुर,उदय चेऊलकरराजेश दातखीळ पाटील आदी मनसे पदाधिकारी यांनी सोशल डीस्टन्सिंगचा ठेवत पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्याची भेट घेऊन जाब विचारला.


पोस्टाच्या स्वतःची जागा गेले पाच वर्ष जीर्ण व धोकादायक इमारत म्हणून पडीक आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेचे कार्यालय सध्या महापालिकेच्या भाड्याच्या जागेत आहे. या ठिकाणी कर्मचारी अपुरा असल्यामुळे व रजेवर जात असल्यामूळे ठराविक खिडक्या यामुळे या पोस्ट कार्यालयात नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून रांगा लावतात. नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष न करतात लवकरात लवकर कर्मचारी वर्ग वाढवून सेवा जलद द्यावी व डोंबिवली पश्चिमेस  अजून दोन पोस्ट कार्यालय नव्याने सुरु करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली पश्चिमेतील एकमेव पोस्ट ऑफिस बाबत आलेल्या असंख्य तक्रारी नंतर पाहणी केली व नागरिकांच्या व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मनसे बांधील असून त्याचा योग्य पाठपुरावा करून त्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन नागरिकांना दिले गेले.

डोंबिवलीतील पश्चिमेकडील एकमेव पोस्ट कार्यालयात नागरिकांचे हाल मनसेनी विचारला जाब डोंबिवलीतील पश्चिमेकडील एकमेव पोस्ट कार्यालयात नागरिकांचे हाल मनसेनी विचारला जाब Reviewed by News1 Marathi on September 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लॉकडाऊनमध्ये गाळा हडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने उधळला

   ठाणे , प्रतिनिधी  :  लॉकडाऊन कालावधीत गावी गेलेल्या मुझफ्फर खान या गाळेधारकाचा पंधरा वर्षांपासूनचा गाळा बळकावून मालकाला धमकावण्याचा प्रका...

Post AD

home ads