Header AD

डोंबिवली येथील चार पोलीस ठाण्यातील ७७ पोलिसांना कोरोनाची बाधा तीन पोलिसांचा कोरीनामुळे मृत्यू..


डोंबिवली  ( शंकर जाधव )  :  येथील रामनगर, विष्णुनगर, मानपाडा आणि टिळकनगर या चार पोलीस ठाण्यातील  एकूण ७७ पोलिसांना कारोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यापैकी टिळकनगर पोलीस ठाणे वगळता इतर ३ पोलीस ठाण्यात कोरोनामुळे ३ मृत्यू झाला. कोरोनाचा फैलाव वाढत असताना पोलीस  आपले कर्तव्य बजावत होते. हे कर्तव्य बजावत असतानाच अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली.  डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाणे तसेच पूर्वेकडील डोंबिवली  रामनगर पोलीस ठाणे , टिळक नगर पोलीस ठाणे , मानपाडा पोलीस ठाणे अशी एकूण डोंबिवली शहरात चार पोलीस ठाणे आहेत. यापैकी टिळकनगर पोलीस ठाण्यात २०, राम नगर पोलीस ठाण्यात १५, मानपाडा पोलीस ठाण्यात २९ तसेच विष्णुनगर पोलीस ठाण्यात १३ पोलिसांना कोरोणाची बाधा झाली आहे. यापैकी राम नगर , विष्णु नगर, मानपाडा पोलीस ठाणे येथे प्रत्येकी एक पोलीस कोरोनाने शहीद झाले आहेत. रामनगर येथे शहीद झालेल्या पोलिसाच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांच्या विम्याची रक्कम मिळाल्याची माहिती राम नगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी दिली.तसेच  कोरुना होऊ नये यासाठी  सनीटायझर, मास्क, विटामिन सी वाढवण्यासाठी विविध औषधे देण्यात आली आहेत अशी माहिती दिली. 


डोंबिवली येथील चार पोलीस ठाण्यातील ७७ पोलिसांना कोरोनाची बाधा तीन पोलिसांचा कोरीनामुळे मृत्यू.. डोंबिवली येथील चार पोलीस ठाण्यातील  ७७  पोलिसांना कोरोनाची  बाधा तीन पोलिसांचा कोरीनामुळे मृत्यू.. Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads