Header AD

संसदेत शून्य प्रहरात मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या समर्थनासाठी मुद्दा उपस्थित केला


ठाणे  |   प्रतिनिधी  : खासदार श्री राजन विचारे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात संसदेत शून्य प्रहरात आपला मुद्दा मांडला . महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या ज्वलंत मुद्यासाठी संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले. मराठा आरक्षण हे सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे.सदर विषय घटनापीठा कडे वर्ग करत असताना या संसदेत पारीत झालेल्या 102 व्या घटना दुरुस्ती नुसार प्रकरण वर्ग करण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांच्या आदेशात म्हंटले आहे.102 व्या घटनादुरुस्ती नंतर "राज्यांना एखाद्या विशिष्ट समाजाला मागास दर्जा देऊन त्यांच्यासाठी आरक्षण देण्याचा अधिकार" आहे का ?तो अधिकार केंद्राकडे आहे  हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण घटनापीठा कडे वर्ग केले आहे.यामुळे 102 व्या घटनादुरुस्ती नुसार राज्याचे मागास आयोग नेमण्याचे, मागास प्रवर्गाचे संशोधन करुन त्यांची ओळख पटवायचे अधिकार, आरक्षीत समूह घोषीत करण्याचे अधिकार बाधीत ठेवले आहेत किंवा कसे याबाबत स्पष्टीकरण मा.सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण देण्यासाठी उद्भवलेल्या पेचात हस्तक्षेप करूण मराठा समाजाला न्याय देणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने मराठा समाजाच्या ठरावाला समर्थन देणे कामी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण याचिकेमध्ये केंद्र सरकारने सामील व्हावे व राज्यसरकारच्या बरोबरीने स्थगिती आदेश उठवणे कामी प्रयत्न करावे अथवा या मराठा आरक्षण कायद्याला घटनेच्या 9 व्या अनुसूचित घालावे. देशातील चार कोटी मराठा समाजाच्या नागरिकांचा हा प्रश्न आहे, त्याचे गांभीर्य लक्षात घ्यावे.या वेळी खासदारांनी अध्यक्षांना विनंती करून सांगितले कि   ही बाब म्हणजे चार कोटी मराठा समाजातील नागरिकांशी संबंधित प्रश्न आहे.म्हणूनच, आदरणीय पंतप्रधानां विनंती आहे की ही बाब गांभीर्याने घेत संबंधित मंत्रालय व विभागामार्फत तातडीने कार्यवाही करून मराठा समाजाला न्याय द्यावा. या मुद्द्याला सदर करताना खासदारांनी सांगितले कि घटना दुरुस्ती नुसार केंद्राने राज्यसरकार सोबत स्थगिती उठाविण्यासाठी प्रयत्न केल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. 

संसदेत शून्य प्रहरात मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या समर्थनासाठी मुद्दा उपस्थित केला संसदेत शून्य प्रहरात मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या समर्थनासाठी मुद्दा उपस्थित केला Reviewed by News1 Marathi on September 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads