Header AD

श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाची मान्यता रद्द


◆ ज्यादा बिल आकारणाऱ्या २२ खाजगी रुग्णालयावर केडीएमसीची कारवाई आतापर्यंत ३४ लाखांची वसुली...

कल्याण | कुणाल म्हात्रे  : कोरोना रुग्णांकडून ज्यादा बिल आकारणाऱ्या २२ रूग्णालयांवर आतापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कारवाई केली असून या कारवाईत तब्बल ३४ लाखाची वसुली करत संबंधित रुग्णांना परत केली आहे. शुक्रवारी डोंबिवली पूर्वेकतील श्री स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयावर जादा बिल आकरणी केल्याबद्दल  महापालिकेने कारवाई करत स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिस्ट रुग्णलयाची मान्यता रद्द केली आहे.

       सर्वसामान्‍य कोविड रूग्‍णांची आर्थिक फसवणुक केल्‍याचे  आढळुन आल्याने या रूग्‍णालयास कोविड रूग्‍णालय म्‍हणुन घोषित केलेले आदेश रद्द करत तसेच या रूग्‍णालयाची ३० सप्‍टेंबर २०२० किंवा उपरोक्त अनियमितता दूर करुन रक्कम परत करणे यापैकी जे नंतर घडेल तोपर्यंत निलंबित करण्याचा आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवारयांनी दिलें आहेत. तसेच रुग्णालयातील सर्व रुग्ण डिस्चार्ज होईपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
   
श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाची मान्यता रद्द श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाची मान्यता रद्द Reviewed by News1 Marathi on September 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लॉकडाऊनमध्ये गाळा हडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने उधळला

   ठाणे , प्रतिनिधी  :  लॉकडाऊन कालावधीत गावी गेलेल्या मुझफ्फर खान या गाळेधारकाचा पंधरा वर्षांपासूनचा गाळा बळकावून मालकाला धमकावण्याचा प्रका...

Post AD

home ads