Header AD

सर्वोत्तम शिक्षक-२०२०’ पुरस्काराने ब्रेनली करणार शिक्षकांचा गौरव


 

मुंबई  : कोव्हिड-१९ मुळे शिक्षण क्षेत्राला अनेक मर्यादा आल्या आहेत. शिक्षकांनीही नवीन शिक्षणपद्धती अंगीकारून अधिक तास मेहनत घेत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. या कठीण प्रसंगात आणि संक्रमीत काळात शिक्षकांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी तसेच विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालकांसाठी जगातील शिक्षणाचे सर्वात मोठे ऑनलाईन व्यासपीठ असलेल्या ब्रेनलीने ‘सर्वोत्तम शिक्षक-२०२०’ पुरस्कारांची घोषणा केली आहे. याकरिता सर्वोत्तम शाळा शिक्षक / मुख्याध्यापक, सर्वोत्तम ऑफलाइन शिक्षक आणि सर्वोत्तम ऑनलाईन शिक्षकासह सर्व विभागांतील नामांकने मागवण्यात आली आहेत.


कोव्हिड काळातही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम रहावेत, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून शिक्षणाच्या नियमित निकषांच्याही पुढे जाऊन मेहनत घेतलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.  प्रोसेस व्हेंचर्स (पुर्वाश्रमीचे नॅपर्स वेंचर्स) तर्फे हे पुरस्कार प्रायोजित करण्यात आले असून या उपक्रमातील हे मुख्य भागीदारही आहेत. विजेत्या शिक्षकांना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवले जाईल. तसेच कोणत्याही शाळेतील विजेत्या शिक्षक / मुख्याध्यापकांव्यतिरिक्त, ऑनलाइन शिक्षणातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी शाळेला ३,७५०००रुपयांची  देणगी दिली जाईल. २ ऑक्टोबर २०२० पर्यंत ‘शिक्षक.ब्रेनलीडॉटइन’ या लिंकद्वारे यात नोंदणी करता येईल.


ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसानी म्हणाले की, “शिक्षणाच्या प्रवाहातून एकही विद्यार्थी मागे पडू नये यासाठी या काळात शिक्षकांनी अविरत मेहनत घेतली आहे. शिक्षकांनी त्यांच्या कार्यातून आपल्या आठवणीवर एक अविभाज्य असा ठसा उमटवला आहे. त्यांचे योगदान आपण कधीही विसरू शकणार नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. या शैक्षणिक वर्षासाठी आणि त्याही पलीकडे त्यांचे योगदान कायम स्मरणात रहावे यासाठीचा आमचा हा प्रयत्न असणार आहे."

सर्वोत्तम शिक्षक-२०२०’ पुरस्काराने ब्रेनली करणार शिक्षकांचा गौरव सर्वोत्तम शिक्षक-२०२०’ पुरस्काराने ब्रेनली करणार शिक्षकांचा गौरव Reviewed by News1 Marathi on September 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads