Header AD

अंध व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत

 कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  जेसुस इस लाइफ फाउंडेशन व आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट यांच्या सहकार्याने नूतन प्राथमिक विद्यालय कल्याण पश्चिम येथे मुंबई उपनगरातील अंध व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले जेसिस लाईफ ट्रस्ट यांच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून गोरगरीब आणि गरजू लोकांना खूप मोठी मोलाची मदत करण्यात येत आहे. आर एस पी शिक्षक अधिकारी युनिट च्या माध्यमातून ही संस्था खूप प्रशंसनीय कार्य करीत आहे. आजच्या कार्यक्रमात जवळपास ७५  अंध व विधवा यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात आले.


यावेळी फास्टर पमनानी, मुकेश गवलानी, अमित कुकरेजा उपस्थित होते. तसेच आरएसपी युनिटचे कमांडर मनीलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली महादेव शिरसागर, रामदास भोकनळ, बापू शिंपी, बन्सीलाल महाजन, तुषार बोरसे, जितेंद्र सोनवणे, नितीन पाटील, रितेश पाटील, दत्तात्रय पाटील, दिलीप पावरा या आरएसपी अधिकारी शिक्षकांनी परिश्रम घेतले. तसेच समाजसेवक सुरेश धडके यांनी शाळेसाठी सैनीटायझर स्टॅन्ड देण्याचे आश्वासन दिले.
ब्रिलियंट सिक्युरिटी कंपनीचे संचालक प्रभाशंकर शुक्ला यांनी मोलाचे सहकार्य केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी याबाबत जेसिस लाईफ ट्रस्ट यांचे अभिनंदन केले सदर कार्यक्रमासाठी शाळा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापिका भारती वेदपाठक यांचे आभार मानले.


अंध व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत अंध व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत Reviewed by News1 Marathi on September 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

७३व्या व्हर्च्युअल वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी मानवतेचा कुंभमेळा संत निरंकारी समागम

कल्याण, कुणाल म्हात्रे   :  मागील ७२ वर्षांची परंपरा कायम ठेवत  ’ ७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम ’  यावर्षी जगाची वर्तमान परिस्थिति लक्षात...

Post AD

home ads