Header AD

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची गती वाढवा काम न करणा-यांवर होणार कारवाई

◆ अधिका-यांच्या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा. सोबत अतिरिक्त आयुक्त(२)संजय हेरवाडे....

 

ठाणे राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवबाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ या मोहिमेची गती वाढविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ.विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. दरम्यान जे शिक्षक किंवा इतर कर्मचारी काम करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.


‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा आढावा घेण्यासाठीमहापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज सर्व उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्याअधिकायांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीत ते बोलत होते.


कोरोना विरूद्धच्या लढाईमध्ये महत्वाची मोहिम म्हणून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. ठाणे शहरामध्ये ही मोहिम अतिशय व्यापक प्रमाणातराबविण्यात येत असून याची गती वाढविण्याची गरज असून सर्व सहाय्यआयुक्त आणि वैद्यकिय अधिकार यांनी समन्वयानकाम करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी या बैठकीत दिल्या.


दरम्यान, जे शिक्षक किंवा जे कर्मचारी या मोहिमेत काम करीत नाहीत किंवा काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यांच्यावरकडक कारवाई करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त यांनीदिल्या आहेत.




माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची गती वाढवा काम न करणा-यांवर होणार कारवाई माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची गती वाढवा काम न करणा-यांवर होणार कारवाई Reviewed by News1 Marathi on September 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे शहर जि काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली

ठाणे , प्रतिनिधी  :  भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी,महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यति...

Post AD

home ads