Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३३ हजार तर मृतांची संख्या ७०० पार


 ◆ ५९१ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू ३३,५२० एकूण रुग्ण तर ७०८ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३७७ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण | कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने ३३ हजारांचा आकडा तर मृतांच्या संख्येने ७०० चा आकडा पार केला आहे. आज नव्या ५९१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ५९१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३३,५२० झाली आहे. यामध्ये ४५९५ रुग्ण उपचार घेत असून २८,२१७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ५९१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ८३,  कल्याण प.- १७८, डोंबिवली पूर्व १९५, डोंबिवली प- १०६, मांडा टिटवाळा – २२, मोहना - ४, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १२ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३३ हजार तर मृतांची संख्या ७०० पार कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३३ हजार तर मृतांची संख्या ७०० पार Reviewed by News1 Marathi on September 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads