Header AD

सलाम मुंबईतर्फे अरविंद देशमुख व मनीलाल शिंपी यांचा सन्मान

कल्याण | दि ७ | कुणाल म्हात्रे  : शिक्षक दिनाचे औचित्य साधुन सलाम मुंबई फाउंडेशन तर्फे डॉ कमलादेवी आवटे (शिक्षण उपसचिव महाराष्ट्र राज्य) व संघमित्रा त्रिभुवन (SCRT,उपसंचालक मुंबई,) यांचा उपस्थितीत आरएसपीचे महासमादेशक अरविंद देशमुख, व कल्याण डोंबिवली व ठाणे जिल्हा उपसमादेशक मनिलाल शिंपी यांच्या राज्यस्तरीय कार्याबद्दल शासकीय  राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत असताना उत्कृष्ट कार्य करणाऱ्या काही शिक्षकांचा शिक्षण विभागातर्फे सन्मान करण्यात आला. तसेच आरएसपी अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली शिक्षक युनिट चा सर्व शिक्षक अधिकाऱ्यांचा शैक्षणिक मान्यवरांच्या उपस्थितीत शासनाचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी खड़कपाड़ा पोलिस.स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्याहस्ते सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय शासकीय कुशल नेतृत्व म्हणून आर एस पी शिक्षक कल्याण डोंबिवली यूनिटचे कमांडर मनिलाल शिंपी यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.


सलाम मुंबईतर्फे अरविंद देशमुख व मनीलाल शिंपी यांचा सन्मान सलाम मुंबईतर्फे अरविंद देशमुख व मनीलाल शिंपी यांचा सन्मान Reviewed by News1 Marathi on September 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads