Header AD

नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोफत अँटीजेन टेस्ट शिबिर संपन्न झाले


कळवा  |   अशोक घाग   :  देशात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांनी खारीगांव परिसरातील फेरीवाले व नागरिकांसाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अँटीजेन टेस्ट शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी 262 जणांची टेस्ट करण्यात आली त्यामध्ये फक्त चार जण पॉझिटिव्ह सापडले फेरीवाले व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून या शिबिराचा लाभ घेतला. त्यांना मास्क वाटप करण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिका व केंद्र शासन पुरस्कृत पथविक्री आत्मनिर्भर निधी योजनेच्या माध्यमातून फेरीवाल्याना १०,००० कर्ज दिले जाते त्याचे शिबीर आयोजित केले होते.या शिबिराचा सुमारे  २०० फेरीवाल्यानी लाभ घेतला. याप्रसंगी युवानेता राकेश पाटील, जय पाटील, महिला संघटक सौ.पुष्पलता भानुशाली, सौ.अर्चना पाटील, शाखा संघटक सौ.भारती शिवनेकर, दुर्गेश चाळके व इतर उपस्थित होते. 

नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोफत अँटीजेन टेस्ट शिबिर संपन्न झाले नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने  ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोफत अँटीजेन टेस्ट शिबिर संपन्न झाले Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads