Header AD

शास्त्रीनगर रुग्णालयात सीटी स्कॅन तपासणी केंद्र सुरु करा मनसेची मागणी...


डोंबिवली  ( शंकर जाधव ) : कोरोना आजारावर  जलद उपचारासाठी सिटी स्कॅन तपासणी उपायुक्त ठरत आहेखाजगी तपासणी केंद्र गरीब व गरजू रुग्णांना परवडत नाही. महापालिका  कोविङ रुग्णालयामार्फत डोंबिवलीच्या ज्या खाजगी तपासणी केंद्रावर रुग्णांना तपासणी साठी घेऊन जातात तेथे रुग्णांना तब्बल ५ हजाराचा भुर्दंड पडतो. महापालिका, राज्य सरकार केंद्र सरकार करोडो रुपये खर्च करून रुग्णांना मोफत कोरोना उपचार देत आहे. मग सिटी स्कॅन सारख्या शुल्लक पण कायम स्वरूपी तपासणी केंद्र सुरु करण्यासाठी विलंब लावून महापालिका रुग्णांणाच्या खिशाला चाट का देत आहे.गेल्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०१९  शास्त्रीनगर रुग्णालयात भूमिपूजन झालेल्या व एका महिन्यात सुरु होणाऱ्या सिटी स्कॅन ,एमआरआय तपासणी केंद्राला आज दीड वर्ष होऊन सुद्धा इतका विलंब का ...? पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कोरोना संक्रमणाच्या काळात  उपयुक्त  चाचणी  केंद्र  लक्ष घालून हे केंद्र लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयात सीटी स्कॅन तपासणी केंद्र सुरु करा मनसेची मागणी... शास्त्रीनगर रुग्णालयात सीटी स्कॅन तपासणी केंद्र सुरु करा  मनसेची मागणी... Reviewed by News1 Marathi on September 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads