सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर ३४ वर्षांची निष्कलंक सेवा बजावून सेवानिवृत्त
भिवंडी | प्रतिनिधी : पोलीस सेवेत ३४ वर्ष निष्कलंक सेवा बजावून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरीकांमध्ये जिव्हाळा निर्माण करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर भिवंडी पूर्व विभागाची सेवा करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले . अग्रीकल्चर विभागात एमएससी पर्यंत शिक्षण झालेले नितीन कौसडीकर १९८६ मध्ये पोलीस उप निरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्या नंतर लातूर , नांदेड ,सोलापूर ग्रा.येथील स्थानिक गुन्हे शाखे सोबत नवी मुंबई गुन्हे शाखेत आपली कर्तबगारी दाखवली असून सर्वाधिक काळ गुन्हे शाखेत काम करीत असताना नांदेड येथील त्यागी टोळीतील टाडा लागलेल्या गुंडांची बिहार येथून अटक व सोलापूर येथील उपजिल्हाधिकारी मांडकर हत्या तपास या उल्लेखनीय कामगिरीचा समावेश असून त्यांच्या सेवा काळात पोलीस महासंचालक उत्कृष्ट कामगिरी सन्मानचिन्ह, राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले असून संपूर्ण सेवाकाळात ८७५ कामगिरी बद्दल रिवार्ड म्हणून ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळविले आहेत.

Post a Comment