Header AD

केडीएमसीच्या आरोग्य निरीक्षकांनी केली कर्जतच्या डम्पिंग प्रकल्पाची पाहणी


◆ आधारवाडी डँपिंगवर फुलबागभाजीपाला मळा, फळबाग बहरण्याचा मनपाचा मानस....  

                                      

कल्याण  | कुणाल   म्हात्रे   :   कल्याण डोबिवली मनपाने शुन्य कचरा मोहिम सुरु करुन शहर स्वच्छतेचा वसा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी शनिवारी रविवारी कर्जत येथे त्यांनी राबिवलेल्या ४ एकर  डँपिंग ग्राऊंड वरील फुलबागभाजीपाला मळा, फळबागेचा दोन दिवसीय पाहणीप्रशिक्षण दौरा केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत केला.


         या दौऱ्यानिमित्ताने कल्याण आधारवाडी डँपिंगवर कर्जत येथील डँपिंग ग्राऊंडवर असणाऱ्या उघानाप्रमाणे उघान फुलविण्याचा  प्रशासनाचा मानस असुन काही दिवसात आधारवाडी डँपिंगचे सपाटीकरण काम पुर्ण झाल्यानंतर फुल उघानफळबागभाजीपाला मळा साकारण्याबाबत प्रस्ताव तयार केला असल्याचे घनकचरा व्यवस्थापनचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.


      कोरोना संकट सुरुवात पार्श्वभूमीवर दरम्यान प्रशासनाने कचराकुंडी मुक्त शहर मोहिम सुरू केली. त्यामध्ये व्यापक जनजागृती माध्यमातून ओलाकचरा सुका कचरा वर्गीकरण बंधनकारक करीत शुन्य कचरा मोहिम व्यापक केली. ओला व सुका कचरासाठी वेगवेगळ्या घंटागाडी मार्फत गोळा केला जात आहे. ओला कचर्याची डँपिंग वर विल्हेवाटीसाठी नेला जातो. तर सुका कचार्याच्या भंगार माध्यमातून भंगारवाल्यांना प्लँस्टिककाचातस्म भंगार विक्रितुन मनपा उत्पन्न स्त्रोत तयार झाला आहे.


शहरामध्ये इतस्ततः कचरा टाकणार्या वर क्लीन मार्शलची नेमणूक करण्यात आली असुन यामध्ये कचरा टाकणार्या कडुन २००रू दंड ते ५ हजार रू दंड वसुल  केला जात आहे. तसेच प्लाँस्टिक पिशव्या बंदीमुळे कापडी पिशव्यांना प्राधान्य मिळणार आहे. मनपाक्षेत्रातील महिला बचत गटांनी पुढे आल्यास कापडी पिशव्या बनविण्याच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. कोवीड पार्श्वभूमीवर मनपाक्षेत्रात सँनिटायझरधुरवणीफावरणी मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच गणपती उत्सवानिमित्त निर्मल्य कलशातुन संकलित केलेल्या निर्मल्यातुन डँपिंग करीत मनपाने खतनिर्मिती कडे भर दिला आहे.


 मनपाच्या पुढकाराने ६ सोसयटीनी पुढकार घेत ओल्या कचर्यापासुन खत निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत. अशा सोसयटीना ५टक्के कर सवलत योजना सुरु करण्यात आली आहे. नव्याने इमारत परवानगी घेताना  खतनिर्मिती प्रकल्प राबिविणे निकडीचे केले आहे. पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शुन्य कचरा मोहिम, उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती  उपआयुक्त रामदास कोकरे यांनी दिली.

केडीएमसीच्या आरोग्य निरीक्षकांनी केली कर्जतच्या डम्पिंग प्रकल्पाची पाहणी केडीएमसीच्या आरोग्य निरीक्षकांनी केली कर्जतच्या डम्पिंग प्रकल्पाची पाहणी  Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads