Header AD

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदी डॉ. ओमकार माळी यांची नियुक्ती


 

ठाणे  | प्रतिनिधी  :-   राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने डॉ. ओमकार माळी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी डॉ. ओमकार माळी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व रॊजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र दिले.  आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांनुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल, अशी अपेक्षा महेबुब शेख यांनी व्यक्त केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते डॉ. ओमकार माळी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.  डॉ. ओमकार माळी यांच्या नियुक्ती बद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी पंकज सिन्हा, महेश भाईजे, सौरभ तोरस्कर उपस्थित होते. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदी डॉ. ओमकार माळी यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदी डॉ. ओमकार माळी यांची नियुक्ती Reviewed by News1 Marathi on September 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads