Header AD

कल्याण डोंबिवलीत १७८ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू


◆ एकूण ४१,९५१ रुग्ण तर ८२१ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४७२ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या १७८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४१,९५१ झाली आहे. यामध्ये ३८८१ रुग्ण उपचार घेत असून ३७,२४९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-४४कल्याण प  ३४डोंबिवली पूर्व ५५डोंबिवली प- ३८मांडा टिटवाळा  , तर मोहना येथील एका रुग्णांचा समावेश आहे. 


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, २० रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,   रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून२ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून६ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत १७८ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत १७८ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads