Header AD

इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या वितरकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

◆ रेमडेसिवीरटोसिलीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार

कल्याण |कुणाल म्हात्रे  : रेमडेसिवीर आणि टोसिलीझुमॅब इंजेक्शन काळाबाजार प्रकरणात नाव समोर आलेल्या मुंबईतील वितरक प्रवीण जैन याचा अटकपूर्व जामिन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जैन याच्याकडूनच अगोदर अटक झालेल्या आरोपींनी कोणत्याही बिलाशिवाय इंजेक्शन घेतल्याची बाब ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या चौकशीत निष्पन्न झाली आहे. जैन नेमका आहे कोठे याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.

      कोरोना महामारीमुळे अचानक रेमडेसिवीर आणि टोसिलीझुमॅब इंजेक्शनची मागणी वाढली. दुसरीकडे या औषधांचा काळाबाजारास सुरुवात झाली. भरमसाठ किंमतीत इंजेक्शनची विक्री होऊ लागल्याने काळाबाजार थांबवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसत आरोपींची धरपकड करण्यास सुरुवात केली. ठाणे खंडणी विरोधी पथकाने जुलै महिन्यात अरुण सिंगसुधाकर गिरीरवींद्र शिंदेवसीम अहमद अब्दुल अहमद शेखअमिताभ दास या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.

आरोपींकडून रेमडिसिविर आणि टोसिलिझुमॅब इंजेक्शनसह इतरही औषध जप्त करण्यात आली होती. परंतु या आरोपींच्या चौकशीत मुंबईच्या वडाळा येथील वितरक प्रवीण जैन याचे नाव पुढे आले. अटक केलेल्या आरोपींनी जैन याच्याकडून ही औषधे बेकायदा विनाबिल घेतले. आणि करोना बाधीत रुग्णांना औषध मुळ किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली. त्यामुळे खंडणी विरोधी पथकाने तात्काळ जैन याच्या वडाळा येथील कार्यालयावर धडक दिली होती. मात्र तो काही पोलिसांच्या हाती लागला नाही.

पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी जैन याचे कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात सील करत त्याचा शोध सुरु केला. मात्र जैन अद्यापही सापडला नाही. काळाबाजाराचे प्रकरण समोर आल्यापासून जैन गायब झाला आहे. परंतु त्याने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला.

जैन याचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची विनंती खंडणी विरोधी पथकाने ठाणे न्यायालयाकडे केली होती. जैन याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील संजय मोरे यांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. सध्या करोना महामारीच्या काळात लोकांना मदत करण्याची गरज आहे. मात्र आरोपी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांची लूट करत असल्याचा न्यायालयात युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश ए. एस. पंधारीकर यांनी जैन याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

 

इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या वितरकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या वितरकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला  Reviewed by News1 Marathi on September 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads