Header AD

माझे कुटुंब माझी जबाबदारी'' मोहिमेची व्यापकता वाढण्याचे आयुक्तांचे निर्देश शहरातील प्रत्येक नागरिकाचे सर्वक्षण करा



अधिका-यांच्या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा सोबत अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे.

ठाणे   | प्रतिनिधी  :  राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ या मोहिमेची व्यापकता वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिकऱ्यांना दिले. दरम्यान या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.


    ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज सर्व उप आयुक्त, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीत ते बोलत होते.


      कोरोना विरूद्धच्या लढाईमध्ये महत्वाची मोहिम म्हणून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. ठाणे शहरामध्ये ही मोहिम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत असून या मोहिमेची व्यापकता वाढविण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी सर्व अधिका-यांना या बैठकीत दिल्या.

माझे कुटुंब माझी जबाबदारी'' मोहिमेची व्यापकता वाढण्याचे आयुक्तांचे निर्देश शहरातील प्रत्येक नागरिकाचे सर्वक्षण करा माझे कुटुंब माझी जबाबदारी'' मोहिमेची व्यापकता वाढण्याचे आयुक्तांचे निर्देश शहरातील प्रत्येक नागरिकाचे सर्वक्षण करा Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads