Header AD

माझं कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणा साठी भिवंडी सज्ज,नागरिकांनी सहकार्य करावे  महापौर प्रतिभा पाटील 


भिवंडी  |  प्रतिनिधी  : महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढीस सुरवात झाली असल्याने शासनाने जाहीर केलेली माझं कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणासाठी महानगरपालिका सज्ज असल्याची माहिती महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी दिली आहे .


माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासन स्तरावरून सुरू झालेली सर्वेक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे .या प्रसंगी आयुक्त डॉ पंकज आशिया ,उप महापौर इम्रान खान ,अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे ,स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी ,महिला बाल कल्याण समिती सभापती नादिया खान ,शिवसेना गटनेता संजय म्हात्रे ,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मोकाशी ,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते .

महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेत भिवंडी शहरातील प्रशासन, लोकप्रतिनिधी ,स्वयंसेवी संस्था व नागरीकांच्या सहकार्यातून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळविले असून या नव्या सर्वेक्षणात महानगरपालिकेची 353 पथक तैनात करण्यात आली असून त्यामध्ये महानगरपालिका कर्मचारी स्थानिक स्वयंसेवक यांचा सहभाग असून नागरीकांनी या सर्वेक्षणात सर्व आरोग्य विषयक इंतभूत माहिती द्यावी असे आवाहन नागरीकांना महापौर प्रतिभा पाटील यांनी केले आहे .

या सर्वेक्षणात एक पथक दररोज किमान पन्नास घरांचे सर्वेक्षण करणार असून त्यामध्ये किडनी ,उच्च रक्तदाब ,मधुमेह ,हृदयविकार या व्याधींच्या रुग्णांची नोंद करून ते  अँप च्या माध्यमातून शासनाच्या पोर्टल वर नोंदविण्यात येणार असल्याची महिती आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली असून या कामात सर्व स्वयंसेवी संस्था ,राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नागरीक यांचा सहभाग महत्वाचा असून त्या माध्यमातून कोरोना व्यतिरिक्त व्याधीग्रस्त रुग्णांची आकडेवारी समोर येणार असल्याने त्यांच्या उपचारासाठी शासनाकडून  वेगळ्या निधीची मागणी करत येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली .पत्रकार परिषदेच्या सुरवातीला मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मोकाशी यांनी या सर्वेक्षणबाबत माहिती देऊन त्यास जनते पर्यंत पोहचविण्यासाठी माध्यमांच्या सहकार्याची भूमिका महत्त्वाची राहिल असे प्रतिपादन केले .
माझं कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणा साठी भिवंडी सज्ज,नागरिकांनी सहकार्य करावे  महापौर प्रतिभा पाटील  माझं कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणा साठी भिवंडी सज्ज,नागरिकांनी सहकार्य करावे  महापौर प्रतिभा पाटील  Reviewed by News1 Marathi on September 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads