Header AD

शीळफाटा व कल्याणफाटा जंक्शनच्या उड्डाणपूलाच्या कामासाठी एमएमआरडीएने काढली निविदा


भुयारी मार्गाचे ही काम मार्गी लागणार 195 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा...

 

कल्याण | प्रतिनिधी  :  भिवंडी-कल्याण-शीळ मार्गाचे सध्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणो अपेक्षित आहेत. मात्र वाहतूक कोंडीतील अडथळे लक्षात घेता कल्याणफाटा व शीळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल व कल्याण फाटा जंक्शन येथे भुयारी मार्ग करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. ही मागणी विचारात घेता त्याला मंजूरी मिळाली होती. या कामाची निविदा आज एमएमआरडीएने प्रसिद्ध केली आहे.


या कामाकरीता 195 कोटी 24 लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यासाठी एमएमआरडीने निविदा काढली आहे. त्यामुळे कंत्रटदार निश्चीत करुन लवकर उड्डाण पूल व भुयारी जंक्शन मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे. हे दोन्ही उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार झाल्यावर या परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास बहुतांश मदत होणार आहे. भिवंडी-कल्याण-शीळ हा मार्ग अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गे मुंब्रा बायपास मार्गे ठाणेमुंबईला जाता येते. तसेच भिवंडी बायपासमार्गे ठाणेमुंबई-नाशिक महामार्गावर पोहचता येते. त्याचबरोबर कल्याणहून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला जाता येते. नवी मुंबई पनवेल मार्गे पुढे गोवा महामार्गाला जाता येते. कल्याणठाणेनवी मुंबईतील कारखान्यात व सरकारी तसेच खाजगी कंपन्यांत कार्यालयात काम करणा:या चाकरमान्यांकरीता हा मार्ग महत्वाचा आहे.


त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कल्याणफाटा व शीळ फाटा जंक्शन येथील उड्डाणपूल व कल्याण फाटा येथील भुयारी मार्ग महत्वाची कामगिरी पार पाडणार आहे. एमएमआरडीने निविदा प्रसिद्ध केल्याने खासदार शिंदे यांनी एमएमआरडीएच्या अधिका:यांच्या कामगिरीचे आभार व्यक्त करीत या कामाकरीता प्राप्त निविदापैकी योग्य तो कंत्रटदार लवकर निश्चीत करण्याची कामगिरी लवकर पाड पाडावी. जेणो करुन या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी आपेक्षा खासदार शिंदे यांनी व्यक्त केली तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

शीळफाटा व कल्याणफाटा जंक्शनच्या उड्डाणपूलाच्या कामासाठी एमएमआरडीएने काढली निविदा शीळफाटा व कल्याणफाटा जंक्शनच्या उड्डाणपूलाच्या कामासाठी एमएमआरडीएने काढली निविदा Reviewed by News1 Marathi on September 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads