Header AD

एकनाथ शिंदे लवकर बरे होण्यासाठी शिवसेनेतर्फे महाआरती

 कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकनाथ शिंदे लवकर बरे व्हावे यासाठी शिवसैनिक ठिकठिकाणी धार्मिक विधी आणि कार्यक्रम आयोजित करत आहेत. कल्याण पश्चिमेतील शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखेतर्फे आज सायंकाळी हनुमान मंदिरात 'महाआरती' करण्यात आली. ज्यामध्ये बिर्ला कॉलेज शिवसेना शाखा परिसरातील अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हावे या विचाराने ही महाआरती करण्यात आल्याची माहिती आयोजक आणि शिवसेनेचे नेते रवी पाटील यांनी दिली. यावेळी विवेक विचारे, अंजली भोईर, अजय हिरवे, योगेश पाटील, विल्सन जमधने, मनोज मिरकुटे, भूषण तायडे, शिरीष पठाण, शशिकांत श्रीवास्तव, स्वप्नील कदम, विजय उबाळे, ओमकार हरवडे, राम मुसळे, दिलीप सातारकर, गांधी, विजय शिंदे, सौरभ आरोटे, डोकरे, आचरेकर आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एकनाथ शिंदे लवकर बरे होण्यासाठी शिवसेनेतर्फे महाआरती एकनाथ शिंदे लवकर बरे होण्यासाठी शिवसेनेतर्फे महाआरती Reviewed by News1 Marathi on September 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads