Header AD

कल्याण डोंबिवलीत ५३७ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू


 

◆ एकूण रुग्ण ३६,६६८  तर ७४४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४९६ रुग्णांना डिस्चार्ज....



कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ५३७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ५३७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३६,६६८ झाली आहे. यामध्ये ५२३७ रुग्ण उपचार घेत असून ३०,६८७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५३७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ६५कल्याण प.- १७७डोंबिवली पूर्व १७१डोंबिवली प- ९१मांडा टिटवाळा – १६, मोहना येथील १७ रुग्णांचा समावेश आहे. 


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ५३७ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ५३७ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

■शेअर बाजारात गुंतवणुकीद्वारे पैसा कमावण्याच्या कल्पनेने प्रत्येक नवा गुंतवणुकदार उत्साही होतो, तसेच कमी वेळेत तो श्रीमंत होईल, असा विश्वासह...

Post AD

home ads