Header AD

भिवंडी अग्निशमन दलाच्या बहादूर जवानांमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ जणांना जीवनदान !भिवंडी  |  प्रतिनिधी  :  भिवंडीत सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास पटेल कंपाऊंडमधील जिलानी नावाची इमारत कोसळल्याची घटना घडली.या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे बहादूर जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ जणांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले आहे.विशेष म्हणजे घटनेची माहिती मिळताच सर्वात आधी घटनास्थळी पोहोचून त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात केली होती. घटनेच्या ६० तासानंतरही मदतकार्य सुरू असून आतापर्यत ३९ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाले आहेत.या दुर्घटनेनंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने ५० टक्के रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख राजेश पवार यांनी  दिलेल्या विशेष मुलाखातीत दिली  आहे.


भिंवडीतील ४० वर्ष जुनी असलेली जिलानी नावाची इमारत अचानक कोसळल्याची घटना पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.या घटनेची माहिती भिवंडी अग्निशमन दलाला मिळताच दलाचे प्रमुख राजेश पवार हे १० ते १५ मिनिटात शहर महानगरपालिकेच्या तिन्ही फायर ब्रेगडच्या   स्टेशनवरील कार्यरत असलेले जवान अमोल किणी,विजय जाधव,गंगारामभांगे,उत्तम देशमुख,कमलाकर कान्हात, गंगाराम भांगे ,सचिन सावंत,राजू चौधरी, महेश मढवी,रोहिदास गायकवाड,अनिल कोकाटे,प्रवीण मोरे, हरिचंद्र सांबरे देवीदास वाघ,वजीर पाटील,नितीन चव्हाण,प्रवीणमोरे ,हरिश्चंद्र वाघ,नितीन पष्टे,कमलाकर पवार ,जगन्नाथ ठाकरे ,राजेंद्र भगत,नरेंद्र बावणे,महेश पाटील ,संतु भांगरे,संतोष बाबरे ,सुरेश मुठे आदी  जवानांसह घटनास्थळी दाखल झालेे.
त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्थानिकांच्या मदतीने बचावकार्यास सुरुवात केली होती.घटनेच्या दिवशी सकाळी ९ ते १० वाजेपर्यत ८ जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत काढण्यात या फायर ब्रिगेड पथकाला यश आले होते.तसेच १२ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहितीही भिवंडी अग्निशमन दलाचे प्रमुख पवार यांनी दिली.विशेष म्हणजे दुर्घटना घडलेल्या ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आणि दाटीवाटीची वस्ती असल्याने मदतकार्यास अडचणी येत होत्या. मात्र सकाळी ९ च्या सुमारास अग्निशमन दलाच्या सोबतीला एनडीआरएफ तसेचे टीआरएफची पथके दाखल झाल्याने मदतकार्यास वेग आला होता. या तीन्ही टीमनेही घटनेच्या पहिल्याच दिवशी दुपारनंतर सुमारे १७ जणांना जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखाली काढून त्यांना उपचारासाठी दाखल केले होते.


मात्र घटनेच्या ६० तास उलटून गेल्यानंतर आतापर्यत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भिवंडीतील आतापर्यंत घडलेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे.या घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतींसह अनधिकृत उभ्या राहिलेल्या शेकडो इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे जीव धोक्यात असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तरी राज्य शासन व पालिका प्रशासनाने वेळीच धोकादायक व अनधिकृत इमारतींवर कारवाई करावी अशी मागणी या दुर्घटनेनंतर नागरिकांमधून पुढे आली आहे.

भिवंडी अग्निशमन दलाच्या बहादूर जवानांमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ जणांना जीवनदान ! भिवंडी अग्निशमन दलाच्या बहादूर जवानांमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ जणांना जीवनदान ! Reviewed by News1 Marathi on September 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads