Header AD

प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ज्यादा बसेस सोडण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी


 

नवी मुंबई  |  प्रतिनिधी  :  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन मुळे लोकल सेवा बंद आहे. पोटाची खळगी भागवण्यासाठी कामगार वर्ग पुन्हा कामावर रुजू झाला  असून अनेकांना कामावर जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबईमध्ये विशेषतः ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा बंद असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाश्यांना परवडणारा सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव पर्याय असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) ने प्रवाशी प्रवास करत आहेत. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता बसेसची संख्या कमी आहे. कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तासनतास बसची वाट बघण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढवली आहे. 


तरी प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन एनएमएमटी प्रशासनाने बसेस ची संख्या वाढवून ज्यादा बसेस सोडाव्या या मागणीसाठी आज एनएमएमटी व्यवस्थापक शिरीष आदरवड यांना रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळाने भेट दिली. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाप्रमाणे शंभर टक्के क्षमतेने बसेस चालवाव्या व ट्रान्स हार्बर लोकलसेवा बंद असल्यामुळे वाशी, कोपरखैरणे आणि घणसोली आगारातून ज्यादा बसेस सोडण्याची मागणी शिष्टमंडळाने केली या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, पक्षाचे सरचिटणीस एल. आर. गायकवाड, उपाध्यक्ष टिळक जाधव, आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे, युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण मोरे, आयटी सेलचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष संकेत पवार, घणसोली विभाग कार्याध्यक्ष रवी गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ज्यादा बसेस सोडण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ज्यादा बसेस सोडण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी Reviewed by News1 Marathi on September 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads