Header AD

कल्याण-वाशी, कल्याण -पनवेल लोकल सेवा सुरू करा विभागीय रेल्वे समिती सदस्य विकास पाटील यांची मागणी


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : बुधवारी विभागीय रेल्वे बोर्डाची सभा गुगलमिटव्दारे संपन्न झाली.  या सभेत विविध मान्यवरांनी विविध विषय मांडले. तर विभागीय रेल्वे सदस्य विकास पाटील यांनी कल्याण- पनवेल आणि कल्याण- वाशी लोकल सेवा सूरु करण्याची मागणी केली.

हि लोकल सेवा सुरु झाली तर कल्याणडोंबिवलीतील बऱ्याच प्रवाशांना, चाकरमान्यांना याचा लाभ होईल. कल्याण -पनवेल आणि कल्याण-वाशी या दोन्ही रस्त्यावर ट्रँफिक व रस्त्यांची खराब अवस्था   यामुळे  या प्रवासामध्ये जवळजवळ एका तासाच्या प्रवासासाठी कमीतकमी ३-४ तास लोकांचे खर्च होतात. सदर बाबतीत सर्व विचार करून लोकसेवेसाठी रेल्वे बोर्डाने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा व चाकरमान्यांना आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

तसेच मुंबई-भुसावळ  पॅसेंजर पूर्वी दोन्ही वेळेस दोन्ही बाजूने धावत होती. एक पॅसेंजर गाडी काही कारणाने रद्द करण्यात आली तर दुसरी पॅसेंजर लहरी पद्धतीने (कधी बंद तर कधी चालू ) अशी धावत आहे. वास्तविक पाहता ही गरीबांची गाडी आहे. फक्त ४६/-  रुपयात मुंबई ते भुसावळ एवढा प्रवास गरिबांचा होतो. श्रीमंत लोकांसाठी बऱ्याच गाड्या आहेत पण ही गाडी गरीबांची गाडी आहे .आणि जनसामान्यांना या गाडीचा खूप फायदा होत असतो या सर्व बाबींचा विचार करून त्वरित मुंबई भुसावल पॅसेंजर दोन्ही बाजूनी सुरू करावी अशीही मागणी त्यांनी केली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यालगतच्या खाडी किनाऱ्यावरून  छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराची कल्पना सूचली व भारतातील सर्वात मोठे आरमार असलेले राजा होते. तर कल्याण स्टेशनचे सौंदर्यीकरण करताना या बाबींचा विचार करून तसाच लुक देण्यात यावा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा तो खरा सन्मान होईल असे मत पाटील यांनी व्यक्त केले. 

कल्याण-वाशी, कल्याण -पनवेल लोकल सेवा सुरू करा विभागीय रेल्वे समिती सदस्य विकास पाटील यांची मागणी कल्याण-वाशी, कल्याण -पनवेल लोकल सेवा सुरू करा विभागीय रेल्वे समिती सदस्य विकास पाटील यांची मागणी Reviewed by News1 Marathi on September 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads