Header AD

बनावट संभाजी विडी विकणाऱ्या विरोधात भिवंडीत गुन्हा दाखल

 


भिवंडी    |  प्रतिनिधी    :   भिवंडी शहरात संभाजी ,मोहिनी व राजकमल या सुप्रसिद्ध ब्रँड च्या बनावट नकली विडी मोठ्या प्रमाणावर विक्री होत असला बाबत उत्पादक साबळे - वाघिरे अँड कंपनी प्रा.लि. या कंपनीस सुगावा लागल्या नंतर कॉपीराईट कायद्या अंतर्गत काम पाहणाऱ्या मोहम्मद गौस उस्मान खान यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली असता भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील जुना ठाणा रोड येथील ताज सुपारी स्टोअर्स येथे छापा मारून तपासणी केली असता दुकानात संभाजी विडी चे ९६ ,मोहिनी विडी चे १४४ ,राजकमल विडी चे २८ असे एकूण ८४ हजार २४० रुपये किमतीचे  २६६ बॉक्स बनावट विडी आढळून आल्या असून ,दुकान मालक सिफान मोहम्मद आरिफ शेख या विरोधात कॉपीराईट कायदा १९५७ चे कलम ५१ ,६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

बनावट संभाजी विडी विकणाऱ्या विरोधात भिवंडीत गुन्हा दाखल बनावट संभाजी विडी विकणाऱ्या विरोधात भिवंडीत गुन्हा दाखल Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads