Header AD

क्लिनअप मार्शलकडून मास्कच्या नावाने नागरिकांची लुट


कल्याण   |  कुणाल  म्हात्रे   :   
कल्याण डोंबिवलीतील प्रमूख परिसरात कचरा आणि घाण होऊ  नये यासाठी केडीएमसीने नेमलेले क्लिनअप मार्शल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे कोणतेही अधिकार नसतानाही हे 'क्लिनअप मार्शल' लोकांकडून त्याबाबतच्या दंडाची वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसर कचरा आणि घाणमुक्त राहण्यासाठी केडीएमसीने याठिकाणी ठेकेदारामार्फत क्लिनअप मार्शल नियुक्त केले आहेत. स्टेशन परिसरातील रस्त्यावर पान-गुटख्याच्या पिचकाऱ्या मारणाऱ्याथुंकणाऱ्या किंवा कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुलीचे प्रमूख अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. मात्र ही जबाबदारी सोडून हे क्लिनअप मार्शल मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून मनमानी पद्धतीने दंडवसुली करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी दिली.

या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी भोईर हे मनसे कार्यकर्त्यांसह आज सकाळी कल्याण स्टेशन परिसरात दाखल झाले आणि त्यांनी अशा प्रकारची बेकायदेशीर वसुली करताना क्लिन अप मार्शलला रंगेहात पकडले. मास्क लावला नाही म्हणून एका नागरिकाकडून ५०० ते १ हजार रुपये हा क्लिनअप मार्शल उकळत असल्याचे दिसून आले. या क्लिनअप मार्शलला पकडून भोईर यांनी महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

क्लिनअप मार्शलकडून मास्कच्या नावाने नागरिकांची लुट क्लिनअप मार्शलकडून मास्कच्या नावाने नागरिकांची लुट Reviewed by News1 Marathi on September 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणा बेस मेटल व कच्च्या तेलाला आधार

  मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस म...

Post AD

home ads