Header AD

ओकिनावाचा ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग ग्राहकांना वाहन भाड्याने देण्याची सुलभ सुविधा देणारमुंबई   :  ओकिनावा या भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकीचे मालक बनण्याकरिता लवचिक भाडे पर्याय देण्यासाठी ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग केला आहे. भाडेतत्त्वाचा कालावधी १२ महिने ते ३६ महिन्यांपर्यंत असू शकतो. बेंगळुरू व पुणे येथील ओकिनावा डिलरशिप्समध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे आणि आगामी महिन्यांमध्ये भारतभरात विस्तारित करण्यात येईल. ही सुविधा ओकिनावाच्या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून वाहनाची बुकिंग करणा-या ग्राहकांसाठी देखील लाभदायी आहे. ते आता त्‍यांच्या घरामधूनच सुरक्षितपणे व आरामशीरपणे स्थिर वित्तपुरवठा पर्यायाचा सुलभपणे लाभ घेऊ शकतात.


या सहयोगांतर्गत ग्राहक किमान १२ महिन्यांसाठी ओकिनावा वेईकल भाडेतत्त्वावर घेऊ शकतात. या कालावधीनंतर ते विविध स्टाइल व रचनेमधील इतर कोणत्याही मॉडेलमध्ये अद्ययावत करण्याचा अतिरिक्त लाभ घेऊ शकतात. हा सहयोग ग्राहकांना इतर फायनान्सिंग पर्यायांच्या तुलनेत ओटीओ ओनरशिप मासिक हफ्ते भरत दर महिन्याला जवळपास ३० टक्क्यांपर्यंत बचत करण्यामध्ये मदत करेल.


ओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक श्री. जीतेंदर शर्मा म्‍हणाले, "लॉकडाऊन शिथिलतेनंतर ओकिनावाने दुचाकीच्या मागणीमध्ये वाढ पहिली आहे. कोविड-१९ प्रादुर्भावानंतर लोक प्रवासासाठी सार्वजनिक परिवहन टाळत आहेत आणि वैयक्तिक वाहनांचा  अवलंब करत आहेत. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शासनाने देखील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहने किफायतशीर दरामध्ये उपलब्ध होण्याकरिता नवीन धोरणे सादर केली आहेत. ओकिनावाचा ओटीओ कॅपिटलसोबतचा सहयोग हे याच दिशेने कंपनीने उचललेले आणखी एक पाऊल आहे. ई-मोबिलिटीचे मोठे ध्येय संपादित करण्यासाठी उद्योगक्षेत्रातील कंपन्या व सरकारसोबत सहयोग काम करणे हा यामागील मुख्‍य उद्देश आहे."

ओकिनावाचा ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग ग्राहकांना वाहन भाड्याने देण्याची सुलभ सुविधा देणार ओकिनावाचा ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग  ग्राहकांना वाहन भाड्याने देण्याची सुलभ सुविधा देणार  Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads