Header AD

कल्याण डोंबिवलीत ५३६ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू


 

◆ एकूण रुग्ण  ३२,९२९ तर ६९९ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३६३ रुग्णांना डिस्चार्ज



कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली असून हि वाढती रुग्णसंख्या पालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत असून नागरिकांची देखील चिंता वाढली आहे. आज नव्या ५३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्या आला आहे.


      आजच्या या ५३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची 

एकूण संख्या ३२,९२९  झाली आहे. यामध्ये ४३९० रुग्ण उपचार घेत असून २७,८४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


आजच्या ५३६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ७०,  कल्याण प.- १५४डोंबिवली पूर्व १६७, डोंबिवली प- ९०मांडा टिटवाळा – ४२तर मोहना येथील १३ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून१८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ७३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ५३६ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ५३६ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads